शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव महापालिकेत कामगार सेनेची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 01:26 IST

मालेगाव महापालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचा आढावा ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली व मनपा आयुक्त किशोर बोर्डे, उपमहापौर सखाराम घोडके यांच्या उपस्थितीत घेण्यात आला

मालेगाव : महापालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचा आढावा ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली व मनपा आयुक्त किशोर बोर्डे, उपमहापौर सखाराम घोडके यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.शिवसेनाप्रणीत म्युनिसिपल कामगार सेनेच्या मागणीनुसार महापालिकेच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शासकीय सुट्यांच्या दिवशी सफाई व ड्रेनेज व झाडू कामगारांनी केलेल्या कामाचा मोबदला त्वरित देण्यासाठी उपविधी तयार करून येणाºया महासभेत संबंधित विषय त्वरित मंजूर करून त्यांना मोबदला देण्यात यावा, कर्मचारी व कामगारांना शैक्षणिक पात्रतेनुसार पदोन्नती त्वरित देण्यात यावी, अशी सूचना ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांनी बैठकीत केली. कामगारांच्या वारसांना आठ दिवसांच्या आत लाड कमिटीच्या शिफारशीनुसार नोकरीत सामावून घेणेबाबत निर्णय झाला. दिवाळी सणाकरिता सानुग्रह तीन हजार रुपये प्रत्येक कर्मचारी कामगारांना देण्यात येईल, असे निर्देश देण्यात आले. सफाई, ड्रेनेज व झाडू कामगारांना अंदाजपत्रकीय तरतुदीनुसार झाडू, कपडे, साबण, हातमोजे आदी अत्यावश्यक वस्तूंचे नियमानुसार वाटप करण्यास मान्यता देण्यात आली. महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग शासनाच्या मंजुरीप्रमाणे त्वरित मंजूर करून देण्यात येईल. ज्या कामगारांची २५ वर्षं सेवा किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष सेवा झालेली आहे किंवा सेवेत असताना मयत झाल्यास अशा कामगारांना किंवा त्यांच्या वारसांना मोफत घरांचे वाटप करण्यात यावे, अशा सूचना भुसे यांनी केल्या.मानधनावरील कर्मचारी व कामगारांना मानधनात वाढ करून देण्यात यावे, हद्दवाढ कर्मचाºयांना किमान वेतनानुसार वेतन देण्यात यावे व त्याची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी, महानगरपालिकेतील सर्व कर्मचाºयांना सध्या मिळत असलेला वैद्यकीय भत्ता ५००वरून एक हजार रुपये करण्याची मान्यता देण्यात आली.बैठकीला उपजिल्हाप्रमुख प्रमोद शुक्ला, तालुकाप्रमुख संजय दुसाने, महानगरप्रमुख श्रीराम मिस्तरी आदींसह मनपा कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Malegaonमालेगांवmunicipal schoolमहापालिका शाळा