शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

कार्यकर्ते अडगळीत!

By admin | Updated: November 16, 2016 23:08 IST

सेटलमेंट : नेत्यांच्या घरात उमेदवारीची ‘खिरापत’

गिरीश जोशी मनमाडथेट नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या बहुतांश उमेदवाऱ्या नेतेमंडळींच्या नातेवाईक व आप्तेष्टांना बहाल करण्यात आल्याने राबणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला न्याय कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. नेतेमंडळींच्या राजकीय ‘सेटलमेंट’मुळे सामान्य कार्यकर्ते ‘अवसानयानात’ निघाले असल्याची उपरोधिक प्रतिक्रिया शहरातून उमटत आहे. त्याचीच परिणती म्हणून निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.शहराच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून पालिका निवडणुकीकडे पाहीले जाते. या निवडणुकी साठी सर्वच पक्षाच्या इच्छुकांनी आपआपल्या नेत्यांकडे उमेदवारी साठी प्रयत्न केले होते. इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने कोणाला तिकीट द्यायचे व कोणाला डावलायचे अशी पंचाईत नेते मंडळींची झाली. प्रमुख पक्षांमधे सुध्दा नेतेमंडळींचे विचारसरणी नुसार गट तट उपगट असल्याचे नविन नाही. त्यामुळे या गटाने सुचवलेले नाव त्या गटाला मान्य होइलच असे नाही. तर दुसऱ्या गटाने सुचवलेले नाव पहिला गट स्विकारेलच असे नाही. यातूनच शह काटशहाची समीकरणे मांडली जाउ लागली. या वर पर्याय म्हणून नेते मंडळींनी आपआपसामधे जागा वाटून घेतल्या. या उमेदवाऱ्या जाहीर झाल्यानंतर सामान्य कार्यकर्ते मात्र अवाकच झाले. जाहीर झालेल्या उमेदवारांमधे नेते मंडळींच्या नातेवाइकांची व आप्तेष्टांची चलती असल्याचे स्पष्ट झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचे निष्ठेने व प्रामाणीकपणे काम करणाऱ्या कायकर्त्यांची उपेक्षा झाली आहे. पक्षाशी किंवा राजकारणाशी सुतराम संबंध नसलेल्या तसेच कुणालाही परिचित नसलेल्या काही नवख्या उमेदवारांमुळे तर रात्रंदिवस जिवाचे रान करणाऱ्या सच्चा कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. नेत्यांसाठी व पक्षासाठी सामान्य कार्यकर्ते जीवाचे रान करत असतात. रात्रंदिवस त्यांच्या साठी राबतात. पडेल ते काम करतात. मात्र बहुतांशी राबनाऱ्या कार्यकर्त्याला पदासाठी अखेरपर्यंत झुलवत ठेवले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. आपल्या पक्षाची ताकद वाढावी म्हणून दुसऱ्या गोटातून फोडलेल्या कार्यकर्त्यांची बडदास्त ठेवली जाते. नेत्यांचे नातेवाईक, मुले, आप्तेष्ट तसेच चमचेगीरी करनारे उथळ कार्यकर्ते, दुसऱ्या गोटातून फुटून आलेले कार्यकर्ते यांचे पक्षासाठी कुठलेही योगदान नसले तरी त्यांना राजकीय लाभ मिळण्यासाठी उमेदवाऱ्या बहाल करण्याच्या प्रकारामुळे कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. नाराज झालेले इच्छूक व त्यांचे जवळचे कार्यकर्ते या पॅटर्नमधून आपली नाराजी शमउन घेत असतात. नेतेमंडळींच्या स्व-फायद्याच्या राजकीय ‘सेटलमेंट’मुळे सामान्य कार्यकर्ते अडगळीत पडले आहे. हे असेच सुरु राहीले तर नेत्यांच्या मागे ‘आगे बढो...च्या घोषणा देण्यासाठी कार्यकर्ते शोधन्याची वेळ येईल अशी चर्चा शहरात सुरु आहे.