नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे-वाडीवºहे औद्योगिक वसाहतीतील फॅब कंपनीतील स्थानिक कामगार व कंपनी व्यवस्थापन यांच्यामध्ये स्थानिक कामगारांना कामावरून कमी करणे तसेच परप्रांतीय कामगारांना कामावर रूजू केल्यामुळे वाद निर्माण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक कामगारांनी निदर्शने व कंपनीसमोर ठिय्या आंदोलन पुकारले आहे. आज आंदोलनाचा आठवा दिवस असूनही कंपनी प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचे आंदोलकांनी सांगितले.कंपनीचे व्यवस्थापक संदीप चाफेकर यांनी बाऊन्सरच्या माध्यमातून कामगारांना मारहाण व शिवीगाळ केल्याचा आरोप कामगारांनी केला असून, मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. शासनाच्या अध्यादेशानुसार ८० टक्के स्थानिक कामगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा निर्णयाची पायमल्ली झाली असून, स्थानिक कामगारांना रोजगार मिळविण्यासाठी कंपनीच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्याची वेळ आली आहे.आठ दिवसांपासून स्थानिक कामगार प्रवेशद्वारावर बसून शांततेच्या मार्गाने निदर्शने करत आहेत. तर दोन दिवसांपूर्वी सीटू संघटनेचे सरचिटणीस देवीदास आडोळे यांनी कामगारांना किमान वेतन, पगारवाढ तसेच कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्याविषयी इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे; परंतु कंपनी प्रशासन अजूनही आडमुठेपणाचे धोरण अवलंबत असून चर्चा करण्यासाठी तयार होत नसल्यामुळे रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा सीटू संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.फोटो :वाडीवºहे येथील फॅब कंपनीच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करताना स्थानिक कामगार. (14वाडीवºहे1)
कामगारांचे आठ दिवसांपासून आंदोलन सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 16:39 IST
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे-वाडीवºहे औद्योगिक वसाहतीतील फॅब कंपनीतील स्थानिक कामगार व कंपनी व्यवस्थापन यांच्यामध्ये स्थानिक कामगारांना कामावरून कमी करणे तसेच परप्रांतीय कामगारांना कामावर रूजू केल्यामुळे वाद निर्माण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक कामगारांनी निदर्शने व कंपनीसमोर ठिय्या आंदोलन पुकारले आहे. आज आंदोलनाचा आठवा दिवस असूनही कंपनी प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचे आंदोलकांनी सांगितले.
कामगारांचे आठ दिवसांपासून आंदोलन सुरूच
ठळक मुद्देवाडीवºहे : फॅब कंपनी प्रशासनाचे दुर्लक्ष