शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

दहावा मैलवरील बोगद्याचे काम बंद पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 18:16 IST

स्थानिक नागरिक आक्रमक : उड्डाणपूल उभारण्याची मागणी

ठळक मुद्देगुजरात - शिर्डीला जोडणारा जवळचा रस्ता असुन वणी- सप्तशृंगी देवीभक्तांसाठीही हा सोयीस्कर मार्ग आ

वरखेडा : राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ३ वरील दहावा मैल येथे बोगद्या ऐवजी उड्डाणपुलाची मागणी करत स्थानिक नागरिकांनी बोगद्याचे काम बंद पाडले. दहावा मैल विमानतळ रस्ता अजूनही प्रतीक्षेतच आहे. विमानतळावर सध्या रहदारीचे प्रमाण वाढले असून गुजरातला जाणारा हा जवळचा मार्ग असल्याने वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच जानोरी परिसरातील औद्योगिक वसाहतीतील अवजड वाहने देखील याच मार्गाने जात असून येथे बोगद्या ऐवजी उड्डाणपूल करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.सदर रस्ता गुजरात - शिर्डीला जोडणारा जवळचा रस्ता असुन वणी- सप्तशृंगी देवीभक्तांसाठीही हा सोयीस्कर मार्ग आहे. रोजची रहदारी मोठ्या प्रमाणात असुन अवजड वाहनांचीही वर्दळ वाढत चालली आहे. कार्गो तसेच जानोरी येथील औद्योगिक वसाहतीतुन मोठमोठे कंटेनर तसेच अवजड वाहने ये-जा करतात. परंतु साधारण बोगद्यातून ते निघणे जिकिरीचे होईल. तसेच पुढे शिर्डीकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने त्याबाजुनेही वाहने ये-जा करतात. त्यामुळे वाहनांना अंदाज येवू न शकल्याने अपघाताचे प्रमाण अधिक वाढेल. यासाठी याठिकाणी उड्डाणपूलाची आवश्यकता असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. दहावा मैल ते नाशिक एअरपोर्ट रस्त्याचे काम पुर्ण न झाल्यामुळे रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. वाहने चालवताना रस्त्यावरील खड्डे चुकविताना होणारे लहान मोठे अपघात नित्याचेच झाले आहे. शेतकरी व प्रशासन यांच्यात जमिन हस्तांतरित करण्याचा मुद्दा अजुन प्रलंबितच असल्याकारणास्तव रस्ताही प्रतिक्षेतच आहे. या रस्त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने लवकरात लवकर शेतकरी व प्रशासनामधील जमिन हस्तांतरित विषयावर तोडगा काढावा व रस्ता दुहेरी व चांगल्या प्रतीचा बनवावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक