शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट रोड’चे काम पुढील सप्ताहात सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:17 IST

स्मार्ट सिटी अभियानांतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका या १.१ किमी मार्गाचे स्मार्ट रोडमध्ये रुपांतर करण्यात येणार असून, सदर कामास पुढील सप्ताहात सुरुवात होणार असल्याची माहिती नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी दिली आहे.

नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका या १.१ किमी मार्गाचे स्मार्ट रोडमध्ये रुपांतर करण्यात येणार असून, सदर कामास पुढील सप्ताहात सुरुवात होणार असल्याची माहिती नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी दिली आहे. दरम्यान, सदर मार्गावरील वाहतूक वळविण्यासाठी पोलीस आयुक्तालयाला पत्र देण्यात आले आहे.  स्मार्ट सिटी अभियानांतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका हा स्मार्ट रोड करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी १६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सदर स्मार्ट रोडसाठी कंपनीमार्फत दोन ते तीनवेळा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती; परंतु, प्रतिसाद मिळाला नव्हता. आता निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कंत्राटदार निश्चित झाला असून, स्मार्ट रोडच्या कामास प्रत्यक्षात पुढील सप्ताहापासून सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी सुरुवातीला शासकीय कन्या शाळा, बिटको कॉलेज, हुतात्मा स्मारक, प्रिया हॉटेल, जिल्हा बॅँकेचे जुने कार्यालय ते मोडक सिग्नलपर्यंतच्या एका बाजूचे काम सुरू करण्यात येणार आहे. सदर रस्ता हा अतिशय वर्दळीचा असल्याने काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक अन्य मार्गाने वळवावी लागणार आहे. स्मार्ट सिटी कंपनीने पोलीस आयुक्तांशी पत्रव्यवहार केला असून, चर्चाही झाल्याची माहिती थविल यांनी दिली.  स्मार्ट रोडचे काम करताना दुतर्फा साडेसात मीटरचा रस्ता होणार आहे. त्यात काही ठिकाणी रस्त्याची रुंदी कमी असल्याने नियम २१० अंतर्गत जागेचे संपादन करावे लागणार आहे. परंतु, या नियमानुसार करावयाच्या कार्यवाहीस विलंब लागणार असल्याने तूर्त रस्त्याचे काम करण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका