नाशिक : माथाडी कामगारांच्या ठेक्याची निविदा लवकरात लवकर काढावी व हमालीचे दर वाढवून मिळावेत यासह विविध मागण्यांची सोडवणूक होत नसल्याच्या निषेधार्थ राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट कामगार युनियनने सोमवारपासून काम बंद आंदोलन पुकारून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले. या संदर्भात दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शासकीय गुदामातील धान्याची हाताळणी व चढ-उतार करणाऱ्या माथाडी कामगारांच्या मजुरी ठेक्याची मुदत ४ मे २०१४ रोजी संपलेली असतानाही नवीन निविदा काढली जात नाही. त्यामुळे ही निविदा लवकरात लवकर काढली जावी, मजुरीचे दर आधारभूत दर म्हणून घ्यावेत, माथाडी मंडळाने मंजूर केलेल्या मजुरीप्रमाणे दर द्यावेत, कामगारांना मजुरीवरील लेव्ही मजुरी दरा व्यतिरीक्त देण्यात यावी आदि मागण्यांबाबत वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करूनही जिल्हा पुरवठा अधिकारी त्याची दखल घेत नाही. त्यामुळे हे प्रश्न सुटेपर्यंत कामकाज बंद करण्यात येणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
माथाडी कामगारांचे काम बंद आंदोलन
By admin | Updated: February 24, 2015 01:54 IST