शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेचा कालावधी वाढल्याने कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 01:00 IST

विधान परिषद निवडणुकीपाठोपाठ आता शिक्षक मतदारसंघासाठीही आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेतील कामकाज आणखी २ जुलैपर्यंत ठप्पच राहणार आहे. आचारसंहितेमुळे पदाधिकारीही महापालिकेकडे फिरकेनासे झाले असून, धोरणात्मक निर्णय रखडले आहेत.

नाशिक : विधान परिषद निवडणुकीपाठोपाठ आता शिक्षक मतदारसंघासाठीही आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेतील कामकाज आणखी २ जुलैपर्यंत ठप्पच राहणार आहे. आचारसंहितेमुळे पदाधिकारीही महापालिकेकडे फिरकेनासे झाले असून, धोरणात्मक निर्णय रखडले आहेत.  विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक २१ मे रोजी होऊन २४ मे रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली. विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता शिथिल झाली असली तरी कागदोपत्री २९ मेपर्यंत ती सुरूच राहणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी २० एप्रिल २०१८ पासूनच आचारसंहिता लागू झालेली होती. सदर आचारसंहिता संपुष्टात येत नाही तोच नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्याने या निवडणुकीचीही आचारसंहिता लागू झाली आहे. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २५ जून रोजी निवडणूक होणार असून, २८ जून रोजी मतमोजणी प्रक्रिया राबविली जाणार आहे. गेल्या २० एप्रिलपासून निवडणूक आचारसंहितेमुळे महापालिकेतील कामकाज ठप्प झालेले होते. मंजूर कामांबाबत निर्णय घेण्यास प्रशासनाला अडचणी उद्भवत नसल्या तरी नव्याने धोरणात्मक निर्णयासाठी मात्र आचारसंहितेचा अडसर ठरत आहे. आता शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहितेचा कालावधी २ जुलैपर्यंत वाढला आहे. त्यामुळे आणखी सुमारे महिनाभर महापालिकेचे कामकाज ठप्पच राहणार आहे. आचारसंहितेमुळे पदाधिकारीही महापालिका मुख्यालयाकडे फिरकेनासे झाले आहेत. महापालिका आयुक्तांनी अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या कामांच्या निविदा विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर प्रसिद्ध करण्याचे आदेश आपल्या खातेप्रमुखांना दिले होते. परंतु, आता सलगपणे शिक्षक मतदारसंघाचीही आचारसंहिता लागू झाल्याने निविदा प्रक्रिया रखडणार आहे.शहर बससेवेचा प्रस्ताव रखडलानिवडणूक आचारसंहितेत महासभा आणि स्थायी समितीच्या सभा घेण्याची परवानगी असली तरी त्यात कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. त्यामुळे केवळ चर्चा करण्यापलीकडे महासभेला महत्त्व नाही. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहर बससेवा मनपाच्या ताब्यात घेण्यासंदर्भात हालचाली चालविल्या असून, जूनच्या महासभेत तसा प्रस्ताव दाखल केला जाणार असल्याची चर्चा होती. परंतु, आता संपूर्ण जून महिना आचारसंहितेत जाणार असल्याने शहर बससेवेचाही प्रस्ताव रखडणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका