शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन प्रकल्पाची कामे संथगतीने हेच दुर्दैव!

By admin | Updated: November 3, 2015 23:58 IST

अशोक सोनवणे : ‘जल व्यवस्थापन’ विषयावर साधला संवाद

नाशिक : राज्यातील सर्व शहरे ही धरणांच्या पाण्यावर अवलंबून आहेत. तसेच ४८ टक्के वेगाने नागरीकरण होत असल्याने राज्याची तहान भागविणे हे फार मोठे आव्हान सरकारपुढे निर्माण झाले आहे. कारण महाराष्ट्रात सातत्याने कमी पाऊस होतो. त्यामुळे जोपर्यंत राज्यात सिंचन प्रकल्पांच्या कामांना वेग दिला जाणार नाही तोपर्यंत ‘पाणी युद्ध’ मिटणार नाही, असे प्रतिपादन जल व्यवस्थापन व कृषिशास्त्राचे अभ्यासक प्रा. अशोक सोनवणे यांनी केले.रोटरी क्लब आॅफ नाशिकच्या वतीने गंजमाळ येथील रोेटरी सभागृहात आयोजित व्याख्यानामध्ये सोनवणे बोलत होते. यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्रात शेतीशास्त्राचा सूक्ष्म अभ्यास होणे गरजेचे असून शेतीला किती पाणी द्यायचे अन् पाण्याचा वापर कसा करायचा यावर सखोल विचार होणे गरजेचे आहे. राज्यात समन्वयाचे पाणी वाटपाचे सूत्र बिघडल्यामुळे पाणी पेटले आहे. महाराष्ट्र हे शेती उत्पादन व पावसाबाबतीत तुटीचे राज्य राहिले आहे. महाराष्ट्र दुष्काळाचा सामना पन्नास-शंभर वर्षांपासून करत आला आहे, असे नाही तर शिवरायांच्या काळापासून या महाराष्ट्राने दुष्काळ अनेकदा बघितलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने शेतीच्या अर्थशास्त्राचा सूक्ष्म अभ्यास के ला आणि जल व्यवस्थापनाचे सूत्र मांडले ते अंमलात आणणे गरजेचे असल्याचे सोनवणे यावेळी म्हणाले.पावसाबाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो; मात्र भारतात होणाऱ्या पावसामध्ये प्रदेशनिहाय फरक जाणवतो. मेघालय, आसाम राज्यात तेरा हजार मिलिमीटर इतके पर्जन्यमान आहे, तर राजस्थान राज्यात शंभर ते दीडशे पर्जन्यमान आढळते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अंबोली परिसरात सहा ते सात हजार मिलिमीटर इतके पर्जन्यमान आहे, तर अहमदनगर जिल्ह्याच्या परिसरात १५० ते २०० इतक्या प्रमाणात पर्जन्यमानाची स्थिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राहणाऱ्या जनतेला आणि सरकारला नैसर्गिक जलसंपत्तीच्या वापराचे शास्त्र हे समजून घेतल्याशिवाय पर्याय नसल्याचे सोनवणे यांनी सांगितले. राज्यातील तीस हजार खेडी पाण्याचा दुष्काळाला सामोरे जाताहेत. यासाठी जमिनीची भूजल पातळी वाढविणे गरजेचे असून विपुल वृक्षसंपदा निर्माण करण्याची खरी गरज राज्याला आहे. कारण वृक्ष, गवतामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते आणि भूजल पातळी वाढते, असे ते यावेळी म्हणाले. (प्रतिनिधी)