शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार हमी योजनेची कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 00:23 IST

सायखेडा : निफाड तालुक्यातील तारुखेडले या गावातील नोंदणीकृत मंजुरांना रोहयो अंतर्गत कामे मिळावी यासाठी तारुखेडले गावकऱ्यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी (रोहयो) नाशिक यांना निवेदन दिले आहे.

ठळक मुद्देसायखेडा : तारुखेडले येथे कामे सुरू करण्याची मागणी

सायखेडा : निफाड तालुक्यातील तारुखेडले या गावातील नोंदणीकृत मंजुरांना रोहयो अंतर्गत कामे मिळावी यासाठी तारुखेडले गावकऱ्यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी (रोहयो) नाशिक यांना निवेदन दिले आहे.तारुखेडले गावात अनेक रोहयो अंतर्गत नोंदणीकृत मजूर आहेत. परंतु सध्या त्यांच्या हाताला काही कामे नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे व उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व कठोर नियम व लॉकडाऊनमुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रोहयो अंतर्गत ग्रामीण भागातील मजुरांना शासनाने ग्रामीण भागात जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे, यासाठी विभागाने ग्रामपंचायतस्तर व इतर यांना कामाचे नियोजन करण्याची सूचना करावी, तारुखेडले गावात यापूर्वी वन विभागाची रोपवाटिका सुरू होती. त्यामुळे मजुरांना रोजगार मिळत होता. आता रोपवाटिकेमध्ये काम बंद असल्यामुळे मजुरांच्या हाताला कामे नाहीत, तसेच विभागाने कामाचे नियोजन केल्यास गावातील मजुरांना काम मिळेल व त्यांना मदत होईल.यापूर्वी जी कामे रोहयोअंतर्गत तारुखेडले गावात झाली असतील व मजुरांना त्यांच्या खात्यात पगार वितरित झाला असेलच त्याचे एकदा विभागाने लेखापरीक्षण करावे, कारण गरीब मजूर जो खरा काम करतो त्यालाच त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. गावात रोहयोअंतर्गत कामाचे व मजुरांच्या मस्टरची तपासणी केली पाहिजे.रोहयो विभागाने काही योजना असतील तर त्या ग्रामपंचायत स्तरावर त्याची माहिती नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केली पाहिजे. जास्तीत जास्त गावांतील मजुरांची नोंदणी करून त्यांना कामे दिली गेली पाहिजेत, रोहयोअंतर्गत पाणंद रस्ते, वृक्षलागवड, गोठा बांधणे, स्मशानभूमी, वृक्ष लागवड कामे व इतर कामे सर्व नोंदणीकृत मजुरांकडून करून घेतली पाहिजेत. त्यांना जॉब कार्ड वितरित झाले आहे का, त्याची तपासणी केली पाहिजे. यासाठी रोहयो विभागाने ग्रामपंचायत स्तरावर वेळोवेळी आवश्यक सूचना देणे गरजेचे आहे, असे निवेदनात तारुखेडले येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गवळी यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :talukaतालुकाGovernmentसरकार