शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

भगूर बसस्थानकाचे काम संथगतीने सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 00:25 IST

भगूर येथील बसस्थानकाच्या नूतन इमारतीचे काम संथगतीने सुरू असल्याने प्रवासी, विद्यार्थी, कामगार यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे बसस्थानकाशेजारील मैदानात तात्पुरत्या स्वरूपात शेड उभारून द्यावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

ठळक मुद्देप्रवाशांची गैरसोय : तात्पुरत्या स्वरूपात शेड उभारून देण्याची मागणी

भगूर बसस्थानक इमारतीचे काम संथगतीने सुरू असल्याने मोकळ्या जागेत झाडाच्या सावलीत बसची वाट पाहताना प्रवासी.भगूर : भगूर येथील बसस्थानकाच्या नूतन इमारतीचे काम संथगतीने सुरू असल्याने प्रवासी, विद्यार्थी, कामगार यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे बसस्थानकाशेजारील मैदानात तात्पुरत्या स्वरूपात शेड उभारून द्यावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.भगूर येथील बसस्थानकाच्या नूतन इमारतीचे काम आमदार योगेश घोलप यांच्या आमदार निधीतून होत आहे. जुनी बसस्थानकाची इमारत पाडून पाच महिन्यांपूर्वी नूतन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यामुळे पाच महिन्यांपासून भगूर बसस्थानकात येणाऱ्या-जाणाºया बसेस या बसस्थानकाच्या शेजारील मैदानापासून ये-जा करीत आहे. मैदानावर किंवा रस्त्याजवळ बसेस थांबत असल्याने प्रवासी, विद्यार्थी, कामगारांना भर उन्हात रस्त्यावर बसची वाट पहावी लागते. तसेच मैदानावर थांबणाºया बसकरिता प्रवाशांना एका झाडाच्या सावलीत ताटकळत उभे राहावे लागते. यामुळे वयोवृद्ध प्रवासी, महिला व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.जुनी बसस्थानक इमारत पाडून नवीन इमारतीचा पाया खोदण्यात आला. मात्र सदरील काम गेल्या पाच महिन्यांपासून अत्यंत संथगतीने सुरू आहे. यामुळे आगामी एक-दीड वर्षात बसस्थानकाची नवीन इमारत कार्यान्वित होईल याबाबत शाश्वती वाटत नाही. एसटी महामंडळदेखील प्रवाशांच्या गैरसोयीकडे लक्ष देण्यास तयार नाही. त्या ठिकाणी तात्पुरते शेड नसल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करत बसची वाट पहावी लागते.तर स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आदी कुठलीही सुविधा नसल्याने प्रवासी त्रस्त झाले आहे.एसटी महामंडळाचे नुकसानभगूर जुनी बसस्थानकाची इमारत तोडल्यानंतर नूतन इमारतीचे काम संथगतीने सुरू आहे. बसस्थानकाजवळील मोकळ्या जागेत प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने कुठलीही सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. यामुळे त्रास सहन करत ताटकळत उभे राहण्यापेक्षा प्रवासी खासगी वाहतुकीने प्रवास करीत आहे. यामुळे एसटी महामंडळाचे नुकसान होत आहे.

टॅग्स :NashikनाशिकST Strikeएसटी संप