शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेतील स्थायी समितीत ‘महिला राज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 15:54 IST

९ महिला सदस्य : पहिल्यांदाच सभापतीपदी महिलेला संधी मिळण्याचे संकेत

ठळक मुद्देभाजपाने पाचही जागांवर महिलांना संधी देत मीरा हांडगे, कोमल मेहरोलिया, भिकुबाई बागूल, हिमगौरी अहेर-आडके आणि शांताबाई हिरे या सदस्यांची नियुक्ती केली आहेस्थायी समितीवर आता एकूण १६ सदस्यांपैकी ९ महिला सदस्य असणार आहेत.

नाशिक - महापालिकेची आर्थिक रक्तवाहिनी समजल्या जाणाºया स्थायी समितीच्या सभापतीपदाची सूत्रे पहिल्यांदाच महिलेच्या हाती जाण्याचे संकेत मिळत आहेत. स्थायी समितीवर रिक्त झालेल्या ५ जागांवर सत्ताधारी भाजपाने महिला सदस्यांना संधी दिल्याने आता समितीत १६ सदस्यांमध्ये तब्बल ९ महिला सदस्य असणार आहेत. दरम्यान, सभापतीपदासाठी माजी स्थायी समिती सभापती बाळासाहेब अहेर यांच्या सुकन्या हिमगौरी अहेर-आडके यांचे नाव आघाडीवर आहे.महापालिका स्थायी समितीतील आठ सदस्य चिठ्ठी पद्धतीने निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागांवर तौलनिक संख्याबळानुसार, भाजपाचे दिनकर पाटील, उद्धव निमसे, भाग्यश्री ढोमसे, पुष्पा आव्हाड, शिवसेनेचे संतोष साळवे व संगीता जाधव, कॉँग्रेसचे समीर कांबळे आणि राष्टÑवादीच्या सुषमा पगारे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर शिवेसेनेचे प्रवीण तिदमे आणि भागवत आरोटे व मनसेच्या कोटयातील अपक्ष मुशीर सैय्यद यांचे पक्षाने अद्याप राजीनामे न घेतल्याने त्यांचे सदस्यत्व कायम आहे. भाजपाने उर्वरित सदस्य व सभापती शिवाजी गांगुर्डे यांचेसह सीमा ताजणे, विशाल संगमनेरे, श्याम बडोदे आणि सुनीता पिंगळे यांचे राजीनामे घेतले. त्यामुळे, त्यांच्या रिक्त झालेल्या जागांसाठी महापौर रंजना भानसी यांनी बुधवारी (दि.७) विशेष महासभा बोलाविली होती. त्यानुसार, झालेल्या महासभेत भाजपाने पाचही जागांवर महिलांना संधी देत मीरा हांडगे, कोमल मेहरोलिया, भिकुबाई बागूल, हिमगौरी अहेर-आडके आणि शांताबाई हिरे या सदस्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे, स्थायी समितीवर आता एकूण १६ सदस्यांपैकी ९ महिला सदस्य असणार आहेत. त्यात भाजपाच्या ७, शिवसेना आणि राष्टवादीच्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे. परिणामी, स्थायीवर महिला राज दिसून येणार आहे. सत्ताधारी भाजपाकडून सभापतीपदाच्या शर्यतीत आता सभागृहनेता दिनकर पाटील, माजी सभापती उद्धव निमसे आणि माजी मंत्री डॉ. दौलतराव अहेर यांच्या पुतणी आणि माजी स्थायी समिती सभापती बाळासाहेब अहेर यांच्या सुकन्या हिमगौरी अहेर-आडके यांची नावे अग्रभागी आहेत.हिमगौरी अहेर-आडके यांचे नाव आघाडीवरमहापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट आल्यापासून एकदाही स्थायी समितीच्या सभापतीपदी महिलेला संधी मिळालेली नाही. महापालिकेत भाजपाची सत्ता असल्याने यंदाही भाजपाचाच सभापती होणार आहे. पहिल्या वर्षी कॉँग्रेसमधून भाजपात आलेल्या शिवाजी गांगुर्डे या बिगर भाजपेयीस सभापतीपदाची सूत्रे देण्यात आली होती. यावर्षी मूळ भाजपेयींना संधी मिळावी यासाठी आग्रह धरला जात आहे. त्यात हिमगौरी अहेर-आडके यांचे नाव पुढे आलेले आहे. दिनकर पाटील व उद्धव निमसे हे दोन्हीही अन्य पक्षातून भाजपात दाखल झालेले आहेत. त्यामुळे त्यांना संधी देण्याबाबत पक्षात मतभेद आहेत. मात्र, दिनकर पाटील व उद्धव निमसे यांनीही सभापतीपदासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. हिमगौरी यांना सभापतीपद मिळाल्यास अहेर कुटुंबीयात वीस वर्षानंतर पुन्हा एकदा सभापतीपद जाणार आहे. १९९७-९८ मध्ये बाळासाहेब अहेर यांनी सभापतीपद भूषविले होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका