शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

महिला रुग्णालय वही बनायेंगे, नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांचा निर्धार पक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 17:26 IST

 राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळेच चार वर्षांचा विलंब झाल्याचा आरोप

ठळक मुद्देस्त्री रुग्णालयाच्या जागेवरून आजी-माजी आमदार आमनेसामने उभे ठाकलेरुग्णालयासाठी किमान ८ हजार चौ.मी. जागेची आवश्यकता

नाशिक : शहर विकास नियंत्रण नियमावलीच्या अधिन राहून आणि दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या वाहनतळाचा विचार करूनच भाभानगर येथील जागेत शंभर खाटांचे स्त्री रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. सदर जागा मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि रुग्णालयासाठी लागणारी जागाही पुरेशी आहे. त्यामुळे स्त्री रुग्णालयासाठी भाभानगरचीच जागा सुयोग्य असल्याची स्पष्टोक्ती आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे. दरम्यान, राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळेच गेल्या चार वर्षांपासून सदरचे रुग्णालय उभे राहण्यास विलंब झालेला आहे. त्यामुळे या रुग्णालयाबाबत कोणीही राजकारण करू नये, असा सल्लाही फरांदे यांनी दिला आहे.स्त्री रुग्णालयाच्या जागेवरून आजी-माजी आमदार आमनेसामने उभे ठाकले आहे. माजी आमदार वसंत गिते व उपमहापौर प्रथमेश गिते यांनी रुग्णालयाला उघडपणे विरोध दर्शविला तर प्रभागातील नागरिकांनीही एकत्र येत जनहित याचिका दाखल करण्याचा पवित्रा घेतला. या साऱ्या  घटना-घडामोडींनंतर आमदार देवयानी फरांदे यांनी शनिवारी (दि.४) पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. फरांदे यांनी सांगितले, भाभानगरची जागा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि हाकेच्या अंतरावर बसस्थानके आहेत. परिसरातील महिलांना सदर रुग्णालय दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे बनणार आहे. बिटको रुग्णालय व शासकीय रुग्णालयात होणाऱ्या  गर्दीमुळे सामान्य कुटुंबातील महिलांना उपचार मिळण्यात गैरसोयीचे होते. त्यामुळे सदर शंभर खाटांचे रुग्णालय महिलांसाठी उपयुक्त ठरणार आहे. शंभर खाटांच्या रुग्णालयाची निविदाप्रक्रिया व कार्यादेश होऊन चार वर्षांचा कालावधी लोटला आहे. केवळ राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे सदर रुग्णालय प्रलंबित राहिल्याचा आरोपही फरांदे यांनी केला. सामान्य महिलांसाठी उपयोगी ठरणाऱ्या  या रुग्णालयाबाबत आपल्याला कोणतेही राजकारण आणायचे नाही आणि कुणी राजकारण करूही नये. सदर रुग्णालयाबाबत नागरिकांमध्ये काही गैरसमज पसरविले जात आहेत परंतु, त्याठिकाणी शवागृह अथवा पोस्टमार्टेमसारखी सुविधा राहणार नाही. रुग्णालयासाठी किमान ८ हजार चौ.मी. जागेची आवश्यकता आहे. टाकळीरोड येथे रुग्णालयासाठी केवळ १९२० चौ.मी. जागा उपलब्ध होणार होती. त्यामुळे सदर जागेत रुग्णालय उभारता येणे शक्यच नसल्याचा दावाही फरांदे यांनी केला. त्यासाठी फरांदे यांनी सदर जागेचा नकाशाच पत्रकारांसमोर ठेवला....तर महिलाशक्ती रस्त्यावर उतरेलसामान्य गोरगरीब महिलांसाठी होणाऱ्या  या रुग्णालयाला कुणी विरोध करत असेल तर महिलाशक्ती रस्त्यावर उतरेल, असा इशाराही फरांदे यांनी दिला. गेल्या काही दिवसांपासून आपण या प्रकरणात संयम बाळगून आहे. भाजपात शिस्तीला महत्त्व दिले जाते. अन्यथा मलाही आक्रमक होता आले असते. परंतु, कुणीही यात राजकारण आणू नये. जनतेसाठीच सदर प्रकल्प राबविला जात असल्याने त्यांच्या बाजूने उभे राहावे, असा सल्लाही फरांदे यांनी दिला.

टॅग्स :Womenमहिलाhospitalहॉस्पिटल