इंदिरानगर : स्त्री आरोग्य रक्षण हे प्रत्येक कुटुंबाच्या व त्या स्त्रीच्या स्वत:च्या दृष्टीने अत्यावश्यक बाब आहे, असे प्रतिपादन नगरसेविका डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी केले.राधाकृष्ण मंगल कार्यालयात इंदिरानगर आयुर्वेद वैद्य समूहाच्या वतीने आयोजित ‘स्त्री आरोग्याच्या अंतरंगात’ या परिसंवादात बोलताना डॉ. कुलकर्णी म्हणाल्या की, भारतीय स्त्रिया दुर्दैवाने संसारिक व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडीत असताना स्वत:च्या आरोग्याकडे पूर्ण लक्ष देत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी वैद्य मृण्मयी बाविस्कर यांनी स्त्रियांमधील विविध आजार, स्थुलता लक्षणे, कारणे व त्यावर घ्यावयाची काळजी, आहार, विहार याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर उपस्थितांनी प्रश्नोत्तर सत्रात आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गुरू गोविंदसिंग इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या सुनीता आग्रे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्य संदीप चिंचोलीकर यांनी केले. सूत्रसंचालन वैद्य ममता पाठक व आभार वैद्य भूषण वाणी यांनी मानले. (वार्ताहर)
स्त्री आरोग्य रक्षण ही अत्यावश्यक बाब
By admin | Updated: October 6, 2015 23:02 IST