शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
4
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
5
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
6
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
7
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
8
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
9
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
10
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
11
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले
12
Operation Sindoor : भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक
13
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
14
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
15
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
16
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
18
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक
19
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
20
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान

एकत्रित कुटुंब पध्दत रुजविण्यात महिलांचा मोलाचा वाटा

By admin | Updated: November 24, 2014 23:48 IST

अशोक नायगावकर : सिन्नर वाचनालयात ग्रंथालय सप्ताहास प्रारंभ

सिन्नर : भारताची ताकद कोण्या राजकीय पक्षात नसून ती एकत्रित कुटुंबपध्दतीत आहे. भारतामध्ये एकत्रित कुटूंब पध्दत रुजण्यात महिलांचा मोलाचा वाटा असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ मराठी विनोदी लेखक व विडंबन कवी अशोक नायगावकर यांनी केले. सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या ४२ व्या ग्रंथालय सप्ताहाचे पहिले पुष्प नायगावकर यांनी गुंफले. यावेळी नायगावकर यांनी ‘हास्य हंगामा - ३’ या विनोदी कार्यक्रमातून सिन्नरकरांना पोट धरुन हसवले. ‘अशीच तिंबत कणीक राहा तू, गरम तव्यावर भाजत भाज्या, सजव आपल्या सिध्द हातांनी अन्नब्रह्म हे उदव पोकळीत’ या कवितेद्वारे नायगावकर यांनी एकत्र कुटूंब पध्दतीतील महिलांच्या योगदानाचा गौरव केला. पुराणकाळापासून आजतागायत पुरुषांच्या सरंजामशाही मानसिकतेमुळे महिलांवर होत असलेल्या अन्याय त्यांनी आपल्या विनोदी शैलीत मांडतांना सिन्नरकरांना मनमुराद हसविले. स्त्री शिक्षणानंतरच्या काळात महिलांची कार्यक्षमता दुपटीने वाढल्याचेही त्यांनी सांगितले.पूर्वी सर्व कवी आपल्या कवितांमध्ये वेगवेगळ्या प्रतिमा वापरत. यामुळे कवितेची उंचीही वाढली जायची. मात्र आजच्या पिढीला या प्रतिमांचा अर्थ समजत नसल्याने त्यातून निर्माण होणाऱ्या विनोदाचे प्रसंग यावेळी नायगावकर यांनी उपस्थितांना सांगितले. पूर्वी प्रेम समुद्र किनाऱ्यावर, निसर्गाच्या सान्निध्यात फुलायचे. आता तरुणांना मोकळी हवा बाधते, हिरवळीची अ‍ॅलर्जी होते असे सांगताना प्रदुषणाची आपल्या कशी सवय जडल्याचे विदारक सत्यही त्यांनी सिन्नरकरांसमोर मांडले. सव्वाशे कोटी लोक अन् अडीचशे कोटी हातांच्या देशात शेतीत काम करण्यासाठी कोणी तयार नसल्याचे भीषण वास्तवही त्यांनी विनोदाद्वारे उपस्थितांच्या लक्षात आणून दिले. पूर्वी पाण्यासाठी आंदोलने झाली. शंभर वर्षापूर्वी ज्योतिबा फुलेंनी पाण्याचे हौद माणसांसाठी खुले केले. मात्र, माणसाने अविश्वासापोटी पाण्यालाही बाटलीबंद केल्याची कोपरखळीही नायगावकर यांनी मारली.यानंतर महेश भानूशाली यांनी पशू, पक्षी, रेल्वे इंजिनचे तीन आवाज एकाच वेळी काढण्यासह नामवंत सिने-कलाकरांच्या नकला करत सिन्नरकरांची मने जिंकली. वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे प्रायोजक मिलींद गुजराथी यांनी परिचय करुन दिला. याप्रसंगी सिन्नरकर उपस्थित होते. (वार्ताहर)