शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गत वर्षापासूनच महिलांची ‘अस्मिता’ थंड बस्त्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:11 IST

राज्यातील महिलांची अस्मिता जपण्यासाठी गत राज्य शासनाने ग्रामीण भागातील महिला, मुलींना मोफत आणि कमी दरात सॅनिटरी नॅपकिन्स पुरवणाऱ्या ‘अस्मिता प्लस’ योजनेला प्रारंभापासून उदंड प्रतिसाद मिळाला होता. मात्र, महिलांच्या आरोग्याची खºया अर्थाने काळजी घेणाºया ‘अस्मिता प्लस’ योजनेला वर्षभरातच घरघर लागली असून, गत सहा महिन्यांपासून मोफत किंवा अत्यल्प दरातील सॅनिटरी नॅपकिन्स मिळणे बंद झाले आहे.

धनंजय रीसोडकर।नाशिक : राज्यातील महिलांची अस्मिता जपण्यासाठी गत राज्य शासनाने ग्रामीण भागातील महिला, मुलींना मोफत आणि कमी दरात सॅनिटरी नॅपकिन्स पुरवणाऱ्या ‘अस्मिता प्लस’ योजनेला प्रारंभापासून उदंड प्रतिसाद मिळाला होता. मात्र, महिलांच्या आरोग्याची खºया अर्थाने काळजी घेणाºया ‘अस्मिता प्लस’ योजनेला वर्षभरातच घरघर लागली असून, गत सहा महिन्यांपासून मोफत किंवा अत्यल्प दरातील सॅनिटरी नॅपकिन्स मिळणे बंद झाले आहे.नाशिक जिल्ह्यातून ३९ महिला बचतगटांनी त्यासाठी नोंदणी केलेली असून, त्यांना गत दिवाळीनंतर सॅनिटरी नॅपकिन्सचा पुरवठाच झालेला नसल्याने मोठ्या कंपन्यांच्या दबावातून ही योजना गुंडाळली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त यंत्रणेलादेखील योजनेच्या अंमलबजावणीच्या खंडाबाबत काहीच सोयरसुतक नसल्याचेच दिसून येत आहे.गतवर्षी १६ लाखांवर महिला लाभार्थीतब्बल १५ लाख ९८ हजारपेक्षा जास्त महिला आणि जिल्हा परिषद शाळेतील ४७ हजारपेक्षा जास्त मुलींनी या शासकीय योजनेचा लाभ घेतला होता. २८ हजार पेक्षा जास्त महिला अस्मिता सॅनिटरी नॅपकिन विक्र ीचा व्यवसाय करीत असल्याची शासनाकडे नोंद होती. तसेच त्यांना सॅनिटरी नॅपकिन पोस्टाद्वारे घरपोच मिळणार आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अस्मिता अ‍ॅपद्वारे अस्मिता, अस्मिता प्लस व अस्मिता बजार या तिन्ही योजनांची अंमलबजावणी करण्याचे नियोजन करण्यात आले होते.माफक दरात सॅनिटरी पॅडअस्मिता योजनेतून ग्रामीण भागातील महिलांनाही माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यास प्रारंभ झाला होता. दोन आकारांची आठ नॅपकिन्सची पाकिटे ग्रामीण महिलांना अनुक्रमे २४ आणि २९ रु पयांना उपलब्ध करून देण्यात आली होती. वितरकांकडून सॅनिटरी नॅपकिनचे पाकिटे खरेदी करून बचत गटांमार्फत त्यांची परस्पर विक्र ी करण्यासही मंजुरी देण्यात आली होती.पाच रुपयातील सुविधाग्रामीण भागातील फक्त १७ टक्के महिला या मासिक पाळीच्या वेळी सॅनिटरी नॅपकिनचा वापर करतात. उर्वरित महिलांना त्यांच्या किमती परवडत नसल्याने सॅनिटरी नॅपकिनच्या वापराअभावी विविध आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळेच मुली आणि महिलांना स्वस्तात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत अस्मिता योजना जाहीर करण्यात आली होती. ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना फक्त पाच रुपयांमध्ये आठ सॅनिटरी नॅपकिन देण्याची योजना राबविण्यात आली होती. तसेच मुलींना वर्षभरात १३ पाकिटे उपलब्ध करून देण्याचा निर्णयदेखील झाला होता.सात लाख मुलींना अस्मिता कार्डअस्मिता योजनेतून जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १७ वयोगटांतील किशोरवयीन मुलींना त्यासाठी किशोरवयीन मुलींची आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत नोंदणी करून त्यांना अस्मिता कार्ड देण्यात येणार आहे. अस्मिता कार्डधारक किशोरवयीन मुली बचत गटांकडून सॅनिटरी नॅपकिन खरेदी करतील. पहिल्या टप्प्यात राज्यातील साधारण सात लाख मुलींना अस्मिता कार्ड देण्याचा निर्णय घेऊन त्यानुसार नियोजन आखण्यात आले होते. अस्मिता कार्डधारक किशोरवयीन मुलींना पाच रु पयांप्रमाणे विक्र ी केलेल्या पॅकेटच्या संख्येच्या प्रमाणात प्रती पॅकेट १५.२० रु पयांप्रमाणे अनुदान शासन बचतगटांना देण्याचे निश्चित झाले होते.

टॅग्स :Womenमहिलाnmmcनवी मुंबई महापालिका