शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रीच्या नवरंगांसाठी महिलांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:19 IST

नवरात्र म्हणजे बुद्धी-शक्तीचे प्रतीक असणाºया देवींच्या जागराचा उत्सव. हा उत्सव टिपºया, गरबा, उपवास, पाठ, होमहवन, महापूजा, देवदर्शन आदींद्वारे साजरा केला जातो. त्यात आता नवरात्रीचे नऊ दिवस वेळापत्रकानुसार निर्धारित रंगांच्या साड्या व ड्रेस परिधान करण्याची परंपरा गेल्या काही वर्षांपासून रूढ झाली आहे.

नाशिक : नवरात्र म्हणजे बुद्धी-शक्तीचे प्रतीक असणाºया देवींच्या जागराचा उत्सव. हा उत्सव टिपºया, गरबा, उपवास, पाठ, होमहवन, महापूजा, देवदर्शन आदींद्वारे साजरा केला जातो. त्यात आता नवरात्रीचे नऊ दिवस वेळापत्रकानुसार निर्धारित रंगांच्या साड्या व ड्रेस परिधान करण्याची परंपरा गेल्या काही वर्षांपासून रूढ झाली आहे.या परंपरेमुळे एकाच वेळी अनेक हेतू साध्य होत असून, दैनंदिन रुटीनमध्ये अडकलेल्या महिलांना वेगळेपणाचा, आनंदाचा अनुभव मिळत आहे. नवरात्रात देवीला नेसवल्या जाणाºया विशिष्ट रंगांच्या साड्यांच्या वेळापत्रकाप्रमाणे महिला साड्या व ड्रेस परिधान करत असून, यातून धार्मिक समाधानाबरोबरच काम करत असलेल्या ठिकाणी एकोप्याचे समाधान, स्त्रीशक्तीची प्रचिती करून देणे, वैविध्यपूर्ण रंग परिधान करीत मिळवलेला आत्मविश्वास अशा अनेक बाबी साध्य होत आहे. हे वेळापत्रक काटेकोरपणे पाळण्यासाठी सध्या महिलावर्गाची लगबग दिसून येत आहे. सोशल मीडियासह इतर मार्गाने नवरात्रातील रंगांचे वेळापत्रक आधीच सर्वांकडे पोहोचले असून, त्यानुसार आपापले वॉर्डरोब तपासत पोशाख क्रमवार लावून ठेवणे, त्यावरील मॅचिंग दागिने पाहून ठेवणे, नसलेल्या रंगाची साडी व ड्रेस खरेदी करणे, मैत्रिणी, नातेवाइकांशी त्याबाबत चर्चा करणे, आॅफिस, कंपनी याबरोबरच दर्शन, यात्रा, भजन आदी ठिकाणी जाण्याचे नियोजन यावर भर दिला जात आहे. दुकानांमध्येही नवरात्रीचे रंग असणाºया साड्या, ड्रेस आकर्षकपणे डिस्प्ले केलेले पहायला मिळत आहे. मॅचिंग दागिने, बांगड्या, पादत्राणे, पर्स आदींची खरेदीही जोरात असून, काहींनी मेकअपचेही नियोजन केले आहे. महिलावर्गासाठी आनंदाची पर्वणी असून, या संधीचा पुरेपूर लाभ घेण्याचे नियोजन महिलावर्गात दिसून येत आहे. त्यामुळे नवरात्रात सर्वत्र एकरंगी दृश्य पहायला मिळणार आहे. दररोज एकाएका रंगात सर्वच महिला दांडिया खेळताना दिसणार आहेत.