शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भर पावसाळ्यात पाण्यासाठी महिलांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 00:41 IST

पिंपळगाव बसवंत :नाशिक जिल्ह्याची वाटचाल स्मार्ट सिटी कडे सुरू आहे ही गोष्ट आनंदाची आहे पण स्वतंत्र काळापासून निफाड तालुक्यात असलेल्या नांदुर्डी गावाच्या परिसरातील आदिवासी वस्त्यांकडे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणेने ढुकुन देखील बघितलेले नाही. शिवाय स्थानिक ग्रामपंचायतीने देखील अशा वस्तीची जबाबदारी झटकून टाकली आहे. निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथील आदिवासी महिलांवर जीवघेणी कसरत करत पाणी आणण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देउदासीनता : कारामाई नदीच्या पाण्यात जीवमुठीत घेऊन मार्गक्रमण

पिंपळगाव बसवंत :नाशिक जिल्ह्याची वाटचाल स्मार्ट सिटी कडे सुरू आहे ही गोष्ट आनंदाची आहे पण स्वतंत्र काळापासून निफाड तालुक्यात असलेल्या नांदुर्डी गावाच्या परिसरातील आदिवासी वस्त्यांकडे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणेने ढुकुन देखील बघितलेले नाही. शिवाय स्थानिक ग्रामपंचायतीने देखील अशा वस्तीची जबाबदारी झटकून टाकली आहे. निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथील आदिवासी महिलांवर जीवघेणी कसरत करत पाणी आणण्याची वेळ आली आहे.गावाच्या स्मशानभूमी जवळील व राणवड कारखान्यालगत डाव्या कालव्या जवळ असलेल्या दोन आदिवासी वस्त्या या वस्तीत पाणी, घरकुल, शौचालय, लाईट, रस्त्यांविना उपेक्षा आजही सुरु असल्याचे भयाण वास्तव पहावयास मिळत आहे. भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नांदुर्डी व उगाव खेड या दोन्ही गावाच्या मधोमध असलेली कारामाईनदी ओलांडून उगावखेड येथील शेतकरी निफाडे यांच्या विहिरीतून पाणी आणावे लागते पण नदीचा ओस वाढला तर पाण्यासाठी जीव पाण्यातच वाहून जाईल ही भीतीही न बाळगता या महिलांची नदीतून ही कसरत शासनाने वेळेत लक्ष देणे गरजेचे आहे. सहाशे ते सातशे आदिवासी लोक वस्ती असलेल्या नांदर्डी गावातील सूर्यवंशी नगर व राघोजी भांगरे नगर अशा दोन आदिवासी वस्तीत चारशे ते पाचशे नागरिकांकडे मतदान कार्ड, आधार कार्ड , रेशन कार्ड देखील आहे मात्र परिसरात कुठल्याही मूलभूत सुविधा नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकीच्या पाशर््वभूमीवर येतात व निवडणूका झाल्यावर फिरकून पण पाहत नाही.परिणामी त्या वस्तीतील बांधवाना कुठल्याही सोयी व सुविधा नसल्याने आत्ता पर्यंत लोकप्रतिनिधींनी फक्त आश्वासनाचीच खैरात वाटली असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.आदिवासी समाजाच्या बोटावर मोजता येतील एवढ्या गरजा आहे पण कोणत्याही नेत्याने किंवा शासनाने त्या सोडवण्याचा प्रत्यन केला नाही. वारंवार पत्रव्यवहार व हंडा मोर्चा करून देखील गेंड्याच्या कातढ्याच शासन दखल घेत नाही. नेते, पुढारी जेवढे जबाबदार आहे तेवढे सरकारी यंत्रणाही आहे. या उपेक्षित लोकांचे प्रश्न तत्काळ सोडविण्यात यावेत.- वंदना कुडमते, उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा, आदिवासी शक्ती सेनाजोराचा पाऊस असल्याने नदीला पूर आला होता. त्यामुळे चार दिवसांपासून पिण्यासाठी पाणी नव्हते. घराच्या बाहेर हंड्यात साचलेले पावसाचे पाणीच दोन दिवस प्यायला लागले. त्यामुळे काही जण आजारीही पडले पण नाईलाज होता आज पूर ओसरला तेव्हा नदीच्या पलीकडे असलेल्या उगाव खेडे या गावातून पाणी आणले.- सरला कोकाटे, नांदुर्डी

फोटो :नांदुर्डी गावातील आदिवासी महिलांची पाण्यासाठी वाहत्या नदीतून सुरू असलेली भटकंती. (26पिंपळगाव1)

 

टॅग्स :Rainपाऊसwater pollutionजल प्रदूषण