शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

स्त्रियांनी स्वत:ची शक्ती ओळखावी : दीपाली सय्यद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 01:27 IST

नारीशक्तीने नेहमीच आपले सामर्थ्य दाखविले असून, कोणत्याही प्रसंगातून आणि कष्टातून स्त्रीने स्वत:ला सिद्ध केले आहे. तिच्यात उपजतच कुटुंबाला सावरण्याची आणि प्रसंगाला सामोरे जाण्याची शक्ती असते.

नाशिक : नारीशक्तीने नेहमीच आपले सामर्थ्य दाखविले असून, कोणत्याही प्रसंगातून आणि कष्टातून स्त्रीने स्वत:ला सिद्ध केले आहे. तिच्यात उपजतच कुटुंबाला सावरण्याची आणि प्रसंगाला सामोरे जाण्याची शक्ती असते. स्त्रीने आपल्याती शक्ती ओळखली पाहिजे, असे प्रतिपादन मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी केले.प. सा. नाट्यमंदिर येथे अस्तित्व फाउंडेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय अस्तित्व पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी सय्यद बोलत होत्या. व्यासपीठावर सीताबाई मोहिते, रोहिणी वाघ, विमल पटेल, संगीता सोनवणे, सुनंदा पटवर्धन, विजया मानमोडे उपस्थित होत्या. यावेळी दीपाली सय्यद म्हणाल्या, प्रत्येक स्त्रीला आत्मसन्मान असतो. या आत्मसन्मानाचे रक्षण कुटुंब आणि समाजानेही करणे अपेक्षित आहे स्त्रीच्या कामाचे कौतुक झाले आणि तिला प्रोत्साहन मिळाले तर स्त्री कोणत्याही क्षेत्रात आपली प्रतिमा निर्माण करू शकते. तिला संधीची गरज आहे, असे म्हणाल्या. प्रास्ताविक फाउंडेशनच्या अध्यक्ष सुवर्णा कोठावदे यांनी केले, तर सूत्रसंचालन सोनाली म्हरसाळे यांनी केले.यांचा झाला सत्कारदीपाली सय्यद यांच्या हस्ते डॉ. मेघा ताडपत्रीकर (पुणे), सीताबाई मोहिते (जालना), आदिवासींसाठी लढा देणाऱ्या डॉ. प्रतिभा शिंदे (धुळे), प्रमिला कोकड (जव्हार), संपदा हिरे, रोहिणी वाघ, शरीरसौष्ठवपटू स्नेहल कोकणे, धावपटू नलिनी कड, कॅन्सरग्रस्तांसाठी काम करणाऱ्या नलिनी कड ( मुंबई), सुनंदा पटवर्धन (जव्हार), सुवर्णा कटारिया (सोलापूर), विजया मानमोडे (पुणे), सपना पारख (नाशिक), मेघा ताडपत्रीकर (पुणे), वीरमाता सुषमा मांडवगणे, रोहिणी वाघ, स्नेहा पाटील (नाशिक), प्रीती आगाज, एकादशी लोंढे (सांगली), प्रिती चव्हाण यांचा गौरव करण्यात आला.

टॅग्स :NashikनाशिकWomenमहिला