शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पेठरोडवर रिक्षातच महिला झाली प्रसूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 01:22 IST

पंचवटीतील पेठरोडवरील महापालिकेच्या मायको दवाखाना आणि प्रसूतिगृहातील कर्मचारी आॅनड्युटी असताना गायब झाल्याने प्रसूतीसाठी आलेल्या महिलेची प्रसूती दवाखान्याच्या खालीच रिक्षात करावी लागली. वेळीच आजूबाजूच्या महिलांनी धाव घेऊन ही प्रसूती सुरक्षित केली असली तरी त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयातील अनागोंदी उघड झाली असून, परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दवाखान्यातील अधिकाºयांची झाडाझडती घेतल्यानंतर रजेवर असलेल्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांनी या प्रकाराची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.

नाशिक : पंचवटीतील पेठरोडवरील महापालिकेच्या मायको दवाखाना आणि प्रसूतिगृहातील कर्मचारी आॅनड्युटी असताना गायब झाल्याने प्रसूतीसाठी आलेल्या महिलेची प्रसूती दवाखान्याच्या खालीच रिक्षात करावी लागली. वेळीच आजूबाजूच्या महिलांनी धाव घेऊन ही प्रसूती सुरक्षित केली असली तरी त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयातील अनागोंदी उघड झाली असून, परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दवाखान्यातील अधिकाºयांची झाडाझडती घेतल्यानंतर रजेवर असलेल्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांनी या प्रकाराची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.  एखाद्या दुर्गम खेड्यापाड्यावर घडावी अशी घटना शहरात तेही पंचवटीसारख्या ठिंकाणी घडली असून, हा विषय गाजण्याची शक्यता आहे. पंचवटीत पेठरोड येथे झोपडपट्टी बहुल परिसर असून, तेथे महापालिकेचा दवाखाना व प्रसूतिगृह असून, तेथेही पुरेशा सुविधा नसल्याने ओरड होत आहे. या प्रसूतिगृहात सुविधा देऊ असे वारंवार आश्वासन महापालिका देत आहे. तथापि, प्रत्यक्षात मात्र कोणत्याही सुधारणा होत नसल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. याच परिसरात राहणाºया एका महिलेने रुग्णालयात प्रसूतीसाठी नोंदवले होते. त्यानुसार महिलेला प्रसूतिवेदना होताच येण्यास वैद्यकीय अधिकाºयांनी सांगितले होते. सोमवारी दुपारी सदरची महिला रिक्षाने प्रसूतिगृहापर्यंत आली. परंतु निरोप पाठवूनही कोणीही तिला घेण्यासाठी वा स्ट्रेचर घेऊन आले नाही. सुमारे अर्धातास प्रतीक्षा करूनही तेथे कोणी आले नाही. सर्व कर्मचारी बाहेर गेल्याचे सांगण्यात आले. सुरक्षारक्षकही गायब होता. याप्रकारानंतर त्या महिलेस प्रसूतिकळा येऊ लागताच याच परिसरातील अन्य महिला मदतीला धावल्या आणि रिक्षातच तिची प्रसूती करण्यात आली.  तिला पुत्ररत्न झाल्याचे आणि माता आणि बालक दोघेही सुरक्षित असल्याचे कळाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यानंतर प्रसुतिगृहातील एक महिला कर्मचारी धावत तेथे आली त्यानंतर त्या महिलेस प्रसूतिगृहात नेण्यात आले. यावेळी परिसराचे नगरसेवक जगदीश पाटील, लोकनिर्णय संस्थेचे संतोष जाधव आणि अन्य नागरिकांनी संताप व्यक्त केला.  प्रसुतिगृहातील सर्व कर्मचारी मस्टरवरील नोंदीनुसार हजर होते. मात्र प्रत्यक्षात कोणीच जागेवर नव्हते. एकमेव सुरक्षा कर्मचारी प्रसूतिगृहाच्या छतावर पंतग उडवत होता. नागरिकांचा गोंधळ आणि संताप बघून त्याने रुग्णालयाच्या कर्मचाºयांना तातडीने मोबाइलवर संपर्क साधले. परंतु संतप्त युवकांनी त्याचा मोबाइल काढून घेतला.  प्रसूतिगृहातील शुकशुकाट, मस्टरवरील हजेरीच्या नोंदी अशी सर्व बाबींचे कार्यकर्त्यांनी व्हिडीओ चित्रीकरण केले.  यासंदर्भात नगरसेवक जगदीश पाटील यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. चिरमाडे धावपळ करीत आल्या. त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. डेकाटे यांनी सर्व प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले.सुरक्षारक्षक उडवत होता पंतगप्रसूतिगृहातील सर्व कर्मचारी दिवसभर गायब होतेच शिवाय एकमेव सुरक्षारक्षक प्रसूतिगृहाच्या गच्चीवर पतंग उडवित होता. सुरक्षारक्षक मंडळाच्या माध्यमातून त्याला महपालिकेने नियुक्त केले आहे. त्याच्या भरवशावर सर्व प्रसूतिगृह सोडून देण्यात आले होते.वैद्यकीय अधीक्षकापासून सारेच रजेवरमहापालिकेचा वैद्यकीय विभागाचा कारभार सध्या वाºयावर आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. डेकाटे रजेवर आहेत. मायको प्रसूतिगृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कोकणी हे लवकरच सेवानिवृत्त होणार असल्याने ते रजेवर आहेत. त्यामुळे सर्वच रुग्णालयांमध्ये सावळा गोंधळ आहे.