शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिला ‘अर्थ साक्षर’ होण्याची गरज : अजित जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 00:21 IST

महिला आर्थिकदृष्ट्या साक्षर झाल्या की सजगता वाढेल तसेच कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होऊ शकेल, व त्यांची आर्थिक फसवणूकही टळेल, असे प्रतिपादन सनदी लेखापाल अजित जोशी यांनी केले.

नाशिक : महिला आर्थिकदृष्ट्या साक्षर झाल्या की सजगता वाढेल तसेच कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होऊ शकेल, व त्यांची आर्थिक फसवणूकही टळेल, असे प्रतिपादन सनदी लेखापाल अजित जोशी यांनी केले.डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेचे ६५वे पुष्प जोशी यांनी परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सोमवारी (दि. २०) महिला व ‘अर्थ साक्षरता’ या विषयावर गुंफले. जोशी म्हणाले, पुरुषांच्या तुलनेत महिलांचा आर्थिक बाबतीतील स्वभाव वेगळा आहे. त्या अधिक हिशेबी आणि काटकसरी असतात. पतीकडे आर्थिक व्यवहारांची माहिती मागण्यास त्यांना योग्य वाटत नाही. कुटुंबाच्या आर्थिक व्यवहारांत लक्ष घालून ते समजून घेणे गरजेचे आहे. महिलांची अर्थ साक्षरता वाढल्यास कुटुंबाची आर्थिक स्थिती भक्कम होण्यास मदत होईल, असे जोशी म्हणाले. महिलांनी निरनिराळ्या आर्थिकव्यवहारांची माहिती करून घेणे गरजेचे आहे.पतीचे उत्पन्न किती आहे, ते कसे व कोठून येते, पैसे कोणत्या बँकेत वा कोणत्या शेअर्समध्ये गुंतविले जातात याची जाणीव ठेवणे सहजीवनातील आवश्यक बाब आहे, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक प्रा. डॉ. मिलिंद वाघ यांनी केले. गौरी पटवर्धन यांनी परिचय करून दिला. महिला हक्क संरक्षण समितीच्या अध्यक्ष हेमा पटवर्धन, विलास सूर्यवंशी व्यासपीठावर उपस्थित होते. विराज देवांग यांनी सूत्रसंचालन केले. हिरा पोळ यांनी आभार मानले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक