शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाभानगर येथील महिला रुग्णालयाच्या समर्थनार्थ भारतनगरच्या महिला सरसावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 21:33 IST

आमदार फरांदे समर्थक आता रस्त्यावर : भाभानगरलाच रुग्णालयाची मागणी

ठळक मुद्देप्रस्तावित महिला रुग्णालय काही लोकांकडूनअन्यत्र बांधण्याचा घाट खासगी रुग्णालयांचे हितसंबंध जपण्यासाठीच महिला रुग्णालयाला विरोध

नाशिक : भाभानगर येथील गायकवाड सभागृहालगतच्या जागेत शंभर खाटांचे रुग्णालय उभारण्यास स्थानिक नागरिकांनी विरोधाचा पवित्रा घेतलेला असतानाच, आता जवळच असलेल्या भारतनगर, शिवाजीवाडी, वडाळा, बजरंगवाडी येथील महिला रुग्णालयाच्या समर्थनार्थ पुढे सरसावल्या असून, भाभानगर येथेच रुग्णालय उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे गिते समर्थकांपाठोपाठ आता फरांदे समर्थकांनीही आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.शंभर खाटांच्या रुग्णालयाला भाभानगर येथील स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवित न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भाभानगर येथेच रुग्णालय झाले पाहिजे, अशी भूमिका भारतनगर, शिवाजीवाडी, वडाळा, बजरंगवाडी या स्लम भागातील महिलांनी घेतली असून, तसे निवेदन अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे, भाभानगर येथे प्रस्तावित महिला रुग्णालय अन्यत्र बांधण्याचा घाट काही लोकांकडून घातला जात आहे. परंतु, परिसरात इतर असलेली रुग्णालये ही खूप महागडी असून, गोरगरीब महिला रुग्णालयांना तेथे उपचार घेणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. तरीही खासगी रुग्णालयांचे हितसंबंध जपण्यासाठीच महिला रुग्णालयाला विरोध केला जात आहे. भाभानगर येथील महिला रुग्णालयाची जागा अत्यंत योग्य असून, ती शहराच्या मध्यवस्तीत असल्याने गोरगरीब महिलांना त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे सदर रुग्णालय भाभानगर येथेच बांधण्यात यावे व अन्यत्र स्थलांतरित करू नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर शमीना पिंजारी, रेश्मा खान, अलका चौहान, साजेदा सय्यद, रंजना अंबोरे, हलीमा राजेखान यांच्यासह अनेक महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :Womenमहिलाhospitalहॉस्पिटल