शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मांजरगावच्या दारू दुकानाला महिलांनी ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 23:29 IST

नाशिक : निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर अभयारण्यानजीक असलेल्या मांजरगाव येथील देशी दारू दुकानाला ग्रामस्थांचा विरोध असतानाही ते उघडण्याचा दुकान मालकाचा प्रयत्न तेथील महिलांनी हाणून पाडला असून, या संदर्भात शासन दरबारी तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याचे पाहून गावातील महिलांनी एकत्र येत दारू दुकानाला टाळे ठोकले आहे.

नाशिक : निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर अभयारण्यानजीक असलेल्या मांजरगाव येथील देशी दारू दुकानाला ग्रामस्थांचा विरोध असतानाही ते उघडण्याचा दुकान मालकाचा प्रयत्न तेथील महिलांनी हाणून पाडला असून, या संदर्भात शासन दरबारी तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याचे पाहून गावातील महिलांनी एकत्र येत दारू दुकानाला टाळे ठोकले आहे.नांदूरमधमेश्वर अभयारण्यानजीक असलेल्या मांजरगाव येथे जय मल्हार हॉटेलला देशी दारू विक्रीचा परवाना असला तरी दुकान मालकाने ग्रामसभेची कोणतीही परवानगी घेतली नसल्याने हे दुकान सुरू करण्यास परवानगी देऊ नये, अशा आशयाचे निवेदन मांजरगावचे सरपंच पंडित आनंदा सोनवणे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी, निफाड तालुक्याचे आमदार दिलीपकाका बनकर, सायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि नाशिक येथील राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच तहसीलदार यांना पाठविले होते. गावातील ग्रामस्थांनी ग्रामसभेत तसा ठराव करून शासन दरबारी पाठपुरावाही केला होता. नांदूरमधमेश्वर अभयारण्य असून, या ठिकाणी पर्यटक येतात. या पर्यटकांकडून दारूचे सेवन होऊन अभयारण्याला बाधा पोहचू शकते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे गावातील दारू दुकान कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला असतानाही शासनाने मद्यविक्रीवरील निर्बंध उठविताच, पुन्हा दुकान मालकाने दुकान सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्याची बाब गावातील महिलांना कळताच, त्यांनी दारू दुकानाला टाळे ठाकले. सदर दुकान कायमस्वरूपी बंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा सरपंच पंडित सोनवणे, उपसरपंच मंदा बारकू दौंड, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांनी दिला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक