शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइनद्वारे महिलेची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 01:04 IST

दिंडोरी : युनियन बँक आॅफ इंडियाचे दिंडोरी येथे ग्राहक सेवा केंद्र मंजूर करून देतो असे सांगून येथील आरती विसपुते या महिलेची अज्ञात भामट्याने दोन लाख साठ हजार रुपयांची फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी विसपुते यांनी नाशिकच्या सायबर सेल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दिंडोरी : युनियन बँक आॅफ इंडियाचे दिंडोरी येथे ग्राहक सेवा केंद्र मंजूर करून देतो असे सांगून येथील आरती विसपुते या महिलेची अज्ञात भामट्याने दोन लाख साठ हजार रुपयांची फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी विसपुते यांनी नाशिकच्या सायबर सेल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.स्वत:चा व्यवसाय असावा व आपल्या पतीच्या व्यवसायात हातभार लागावा या उद्देशाने आरती विसपुते यांनी बँकमित्र या वेबसाइटवरील आॅनलाइन ग्राहक सेवा केंद्रासाठी अर्ज केला होता. संशयिताने अमित कुमार असे नाव सांगून बँक मित्र कंपनीचा टेलिमार्केटिंगमध्ये काम करत असल्याचे भासवून नोंदणी फी म्हणून बँक मित्रच्या बँक खात्यात १५ हजार ६०० रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर रिझर्व्ह बँक आॅफ इंडियामध्ये ओव्हरड्राफ्ट ठेव म्हणून पन्नास हजार रुपये भरावे लागतील असे सांगून पन्नास हजार रुपये बँक मित्र कंपनीच्या नावावर भरण्यास भाग पाडले.परत सदर इसमाने फोन करून स्थानिक गावाच्या लोकसंख्येचा विचार करता तुमची रक्कम कमी पडत असून परत पंचवीस हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर फोन करून सांगितले की, तुमचे दीड लाख रुपये रिझर्व्ह बँकेकडे जमा झाले असा मोबाइलवर संदेश पाठविला. त्यानंतर कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या उपकरणांचे डिपॉझिट म्हणून ६५ हजार रुपये भरणा केले गेले. याच सबबीखाली परत ५९ हजार रुपये भरणा केले. आठ दिवसानंतर पुन्हा अमित कुमार याने फोन करून सांगितले. रिझर्व्ह बँक व कंपनीच्या तीन व्यक्ती दिंडोरी येथे येणार असून, त्यांचा राहण्याच्या व खाण्याच्या खर्चापोटी ४५ हजार रुपये द्यावे लागतील. ही रक्कम पण त्याच्या बँक खात्यामध्ये भरली. पैशाच्या सततच्या मागणीमुळे विसपुते यांना संशय आला.

अमित कुमार याच्याशी फोनवर संपर्क साधून सर्व रक्कम परत करण्याची मागणी केली तेव्हा त्याने रक्कम परत हवी असल्यास परतावा रक्कम ५२हजार ५२० रुपये आमच्या खात्यामध्ये भरावे लागतील अशी मागणी केली. त्यामुळे विसपुते यांचा संशय बळावला. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून बँक मित्र या कंपनीची सखोल चौकशी करून फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितास कडक शासन करण्याची मागणी विसपुते यांनी केली आहे.