शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

महिलेची फरशीवरच प्रसूती; डॉक्टरचा हलगर्जीपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 00:41 IST

नाशिक : महापालिका क्षेत्रातील गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयाची वाट दाखविणाऱ्या महापालिका रुग्णालयाचा आणखी एक हलगर्जीपणा समोर आला आहे़ प्रसूतीसाठी कथडा येथील डॉ़ झाकीर हुसेन रुग्णालयात गेलेल्या महिलेला डॉक्टर व नर्सच्या हलगर्जीपणामुळे रुग्णालयाबाहेरील फरशीवरच प्रसूत व्हावे लागले़ तसेच नुकत्याच जन्म झालेल्या बाळाचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, याबाबत महिलेच्या पतीने महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाºयांकडे तक्रार केली आहे़

ठळक मुद्देझाकीर हुसेन रुग्णालय : बाळाचा मृत्यू

नाशिक : महापालिका क्षेत्रातील गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयाची वाट दाखविणाऱ्या महापालिका रुग्णालयाचा आणखी एक हलगर्जीपणा समोर आला आहे़ प्रसूतीसाठी कथडा येथील डॉ़ झाकीर हुसेन रुग्णालयात गेलेल्या महिलेला डॉक्टर व नर्सच्या हलगर्जीपणामुळे रुग्णालयाबाहेरील फरशीवरच प्रसूत व्हावे लागले़ तसेच नुकत्याच जन्म झालेल्या बाळाचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, याबाबत महिलेच्या पतीने महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाºयांकडे तक्रार केली आहे़इंदिरानगर येथील रिजवान रफिक शहा यांनी आरोग्य अधिकाºयांकडे केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या पत्नीला १० जुलै रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास प्रसूतीसाठी दाखल केले़ मात्र, यावेळी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर उपस्थित नव्हते, तसेच पत्नीला प्रचंड वेदना होत असतानाही तिथे असलेल्या नर्सने प्रसूतीसाठी वेळ असल्याचे सांगून बेडवर झोपवून ठेवले़ यावेळी त्यांच्या पत्नीला प्रसूतीकळा तसेच ब्लडिंग सुरू झाल्याचे नर्सला सांगूनही तिने डॉक्टरांना बोलविले नाही़ तसेच प्रसूतीसाठी वेळ आहे असे सांगत डॉक्टर सकाळी येतील असे सांगून झोपण्यासाठी निघून गेली़दरम्यान, रिजवान शहा यांच्या पत्नीला तीव्र वेदना झाल्याने त्या हॉस्पिटलच्या खाली उतरल्या व तिथे असलेल्या फरशीवरच पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास प्रसूत झाल्या़ मात्र, तरीही तेथील नर्सने शहा यांची पत्नी व नवजात बाळाची कोणत्याही प्रकारची काळजी घेतली नाही तसेच डॉक्टरांनाही कळविले नाही़ दरम्यान, दुसºया दिवशी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास या बाळाचा मृत्यू झाला़ निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व आरोग्य उपसंचालकांकडे पाठविण्यात आल्या आहेत़कारवाईची मागणीझाकीर हुसेन रुग्णालयामधील नर्स व कर्मचाºयांच्या चुकीमुळे पत्नीला प्रसूतीसाठी आणलेले असताना कोणत्याही प्रकारे दखल न घेता तसेच नर्सने डॉक्टरांनाही कळविले नाही तसेच प्रसूतीनंतर बाळाचा मृत्यू झाला़ त्यामुळे संबंधित नर्स, हॉस्पिटलच्या कारभाराची संपूर्ण चौकशी करून दोषी नर्स व कर्मचाºयांवर कडक कारवाई करण्याची मागणी रिजवान शहा यांनी केली आहे़

टॅग्स :Healthआरोग्य