शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

महिला बालकल्याण निधीवर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:37 IST

महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीसाठी सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात तरतूद करण्यात आलेल्या १३ कोटी २४ लाख रुपयांच्या निधीवर बांधकामसह अन्य विभागांनी डल्ला मारला असून, तब्बल १२ कोटी ७३ लाख रुपयांचा निधी समितीची परवानगी न घेता पळविला आहे. समितीच्या लक्षात सदर प्रकार आल्यानंतर आक्रमक झालेल्या समिती सदस्यांनी सोमवारी (दि.२५) आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याकडे गाºहाणे मांडले. दरम्यान, आपल्या अधिकाºयांच्या पराक्रमाने चकित झालेल्या आयुक्तांनी येत्या गुरुवारी (दि.२८) सर्व खातेप्रमुखांची बैठक बोलाविली आहे.

नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीसाठी सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात तरतूद करण्यात आलेल्या १३ कोटी २४ लाख रुपयांच्या निधीवर बांधकामसह अन्य विभागांनी डल्ला मारला असून, तब्बल १२ कोटी ७३ लाख रुपयांचा निधी समितीची परवानगी न घेता पळविला आहे. समितीच्या लक्षात सदर प्रकार आल्यानंतर आक्रमक झालेल्या समिती सदस्यांनी सोमवारी (दि.२५) आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याकडे गाºहाणे मांडले. दरम्यान, आपल्या अधिकाºयांच्या पराक्रमाने चकित झालेल्या आयुक्तांनी येत्या गुरुवारी (दि.२८) सर्व खातेप्रमुखांची बैठक बोलाविली आहे.  महापालिकेच्या महिला बालकल्याण विभागासाठी शासकीय धोरणानुसार ५ टक्के निधी राखीव ठेवला जातो. त्यानुसार, सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात २५ टक्के महसुली खर्चासाठी ४ कोटी ४१ लाख रुपये तर ७५ टक्के भांडवली खर्चासाठी १३ कोटी २४ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.  महिला व बालकल्याण समिती गठित झाल्यानंतर सभापती सरोज अहिरे यांनी सदर निधीच्या अनुषंगाने विविध उपक्रमांचे नियोजन करायला सुरुवात केली आणि त्यानुसार, कामांच्या नस्ती पाठविण्यास सुरुवात केली असता निधीची तरतूद नसल्याचे सांगत त्या परत यायल्या लागल्या. त्यामुळे, सभापतींसह समिती सदस्यांनी खोलात जाऊन त्याची चौकशी केली असता, धक्कादायक वास्तव समोर आले. महिला व बालकल्याण विभागाच्या निधीवर विविध विभागांनी डल्ला मारल्याचे लक्षात आले. त्यात बांधकाम विभागाचा सर्वाधिक वाटा आहे. विभागासाठी तरतूद केलेल्या निधीतील १२ कोटी ७३ लाख ५९ हजारांचा निधी महिला व बालकल्याण समितीची परवानगी न घेता परस्पर वळविण्यात आलेला आहे.सद्यस्थितीत केवळ ५० लाख ८१ हजार रुपये निधी शिल्लक ठेवण्यात आला आहे. खातेप्रमुखांकडून झालेल्या या निधीचोरीबद्दल समिती सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि थेट आयुक्तांचे दालन गाठले. आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याकडे याप्रकरणी सरोज अहिरे, सत्यभामा गाडेकर यांनी तक्रार केली आणि वजावट केलेला निधी पुनर्संचयित करण्याची मागणी केली. यावेळी खातेप्रमुखांनी दाखविलेल्या पराक्रमाबद्दल चक्रावलेल्या आयुक्तांनी येत्या गुरुवारी सर्व खातेप्रमुखांची बैठक बोलाविली असून, कोणी किती निधी घेतला याबाबतची माहिती घेतली जाणार आहे.समितीचे नियोजन उपक्रमसमितीने काही उपक्रम नियोजित केले आहे. त्यात महिलांकरिता स्वयंरोजगार प्रशिक्षण, वाहनचालक प्रशिक्षण, ज्युदो कराटे प्रशिक्षण, समुपदेशन केंद्र सुरू करणे, वंचित बालकांचा मेळावा, सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम, बचतगटामार्फत विविध व्यवसाय सुरू करणे, प्रायोगिक तत्त्वावर महिलांकरिता सॅनिटरी नॅपकीन वेडिंग मशीन मुख्य कार्यालयात बसविणे, महिला दिन साजरा करणे आदी उपक्रमांचा समावेश आहे. निधी पळविल्याने शिल्लक ५० लाखांच्या निधीत एवढे सारे उपक्रम कसे राबवायचे, हा प्रश्न आता समितीला पडला आहे.निधी पळविण्याची परंपरामहिला व बालकल्याण समितीचा निधी प्रामुख्याने, बांधकाम विभागाकडून वेगवेगळ्या उपक्रमांच्या नावाखाली पळविण्यात आलेला आहे. समितीच्या सभापती सरोज अहिरे यांनी याबाबत शहर अभियंता उत्तम पवार यांना जाब विचारला असता त्यांनी निर्विकार चेहºयाने निधी वापरण्याची ही परंपरा पूर्वीपासून असल्याचे उत्तर दिले. मागील पानावरून पुढे चालू राहणारी ही परंपरा खंडित करण्यासाठी आता महिला व बालकल्याण समितीने एल्गार पुकारला असून, निधी परत मिळविण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.