शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
4
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
5
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
6
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
7
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
8
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
9
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
10
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
11
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
12
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
13
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
14
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
15
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
16
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
17
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
18
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
19
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
20
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार

चंडिकापूर शिवारात महिलेचा खून

By admin | Updated: September 15, 2015 22:47 IST

वणी : धारदार शस्त्राने वार

वणी : चंडिकापूर शिवारात शेतात वास्तव्यास असणाऱ्या महिलेच्या डोक्यावर, मानेवर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली असून, मयत महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिंडोरी तालुक्यातील चंडिकापूर येथील मोरीचे वावर परिसरात नामदेव सयाजी भोये हे पत्नी लक्ष्मीबाई ऊर्फ कमळाबाई नामदेव भोये (५५) यांच्या समवेत वास्तव्यास असून, अर्धा किलोमीटर अंतरावर मुलगा सुभाष भोये राहतो. सोमवारी रात्री १२.३०च्या सुमारास नाशिक येथे घेवड्याच्या शेंगा विक्री करून आपल्या घरी आले असता लक्ष्मीबाई त्यांच्या नजरेला न पडल्याने नामदेव भोये यांनी हाका मारल्या. तरीही प्रत्युतर न मिळाल्याने घराबाहेर येऊन शोध घेतला. भोये यांच्या घरी विद्युत जोडणी नसल्याने अंधारात ते चाचपडत लक्ष्मीबाईला हाका मारीत होते. दरम्यान, भोये यांच्या हाताला द्रवपदार्थ सारखे काहीतरी लागल्याने त्यांनी बारकाईने बघितले असता, लक्ष्मीबाई रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यांनी त्वरित धावत जाऊन मुलगा सुभाष याला सांगितले. परिसरात माहिती समजताच ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक मिलिंद खोडवे, किरण बैरागी व पोलीस पथकाने पाहणी केली असता, धारदार शस्त्राने लक्ष्मीबाईच्या मानेवर, डोक्यावर, उजव्या हातावर अमानुष पद्धतीने तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे दिसून आले. पोलिसांनी रात्रभर परिसर पिंजून काढला. मात्र धागेदोरे हाती लागले नाही. मंगळवारी सकाळी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल यांनी शवविच्छेदन केले असता, सोमवारी रात्री दहा ते बारा वाजेच्या दरम्यान धारदार शस्त्राने लक्ष्मीबाईची हत्त्या झाल्याचा निष्कर्ष काढला.श्वान पथकाला पाचारण करण्यात आले; मात्र पावसामुळे माग काढण्यात अपयश आल्याची माहिती अशोक सूर्यवंशी यांनी दिली. भोये कुटुंबीय सधन नाही. कोणाशी त्यांचे वैयक्तिक वैमनस्य नव्हते तरीही लक्ष्मीबाईचा खून कोणी केला याबाबत पोलीस तपास सुरू आहे. (वार्ताहर)