शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
3
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
4
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
5
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
6
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
7
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
8
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
9
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
10
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
11
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
12
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
13
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
14
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
15
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
16
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
17
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
18
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
19
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
20
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना

अशोकामार्गावर महिलेची सोनसाखळी खेचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:49 IST

अशोकामार्गावरील मेडिकलमधून औषधे घेऊन रुग्णालयाकडे पायी जाणाऱ्या परजिल्ह्यातील पाहुण्या आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने मंगळवारी (दि.११) रात्री दहा वाजेच्या सुमारास हिसकावून पळ काढला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देरायडर्सचाही उपद्रव : पोलीस गस्त अन् हवी नाकाबंदी

नाशिक : अशोकामार्गावरील मेडिकलमधून औषधे घेऊन रुग्णालयाकडे पायी जाणाऱ्या परजिल्ह्यातील पाहुण्या आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने मंगळवारी (दि.११) रात्री दहा वाजेच्या सुमारास हिसकावून पळ काढला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गणेशबाबानगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या नातेवाइकांची विचारपूस करण्यासाठी राहाता येथून श्वेता व्यंकटेश चिस्ते (२९) या आल्या होत्या. रात्रीच्या सुमारास रुग्णालयातून औषधे घेण्यासाठी त्या बाहेर पडल्या.गणेशबाबा मंदिरापासून पुढे येत मुख्य अशोकामार्गाच्या दुभाजक पंक्चरच्या जवळ आल्यानंतर त्यांनी जवळच्या मेडिकलमधून औषधे घेतली व पुन्हा पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्याला हिसका देत सोनसाखळी खेचली. त्यांनी आरडाओरड केली असता परिसरातील नागरिकांनी त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली. यावेळी चोरट्याने सोनसाखळी तोडल्याने पेंडल रस्त्यावर पडल्याचे श्वेता यांना दिसले, मात्र त्या पेंडलची ३० ग्रॅम सोन्याची साखळी घेऊन चोरट्याने पोबारा केला.श्वेता यांच्या फिर्यादीनुसार ३० हजार रुपयांची सोनसाखळीची चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.वीस दिवसांत दुसरी घटना; महिलांमध्ये भीतीअशोकामार्ग परिसरात दरमहा एकतरी सोनसाखळी चोरीची घटना घडत असल्याने महिलावर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अशोका चौफुली सिग्नलवर पोलीस चौकी असूनदेखील चोरटे सर्रासपणे अशोकामार्गावर सोनसाखळी चोरी करत असल्याचे महिलांनी सांगितले. रात्रीच्या वेळी शतपावली करण्यासाठी तसेच संध्याकाळच्या वेळी महिलांची अशोकामार्गावर गर्दी असते.४एलईडी दिव्यांनी हा रस्ता उजळून निघाला असला तरी चोरटे सर्रासपणे महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावत असल्याने महिलांमध्ये कमालीची भीती पसरली आहे. २१ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अशोकामार्गावरच आदित्यनगरजवळ स्मिता महेश कुलथे या महिलेची १५ ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावून पळ काढला होता. वीस दिवसांनंतर ही दुसरी घटना या भागात घडली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChain Snatchingसोनसाखळी चोरी