शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
3
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
4
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
5
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
6
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
7
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
8
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
9
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
10
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
11
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
12
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
13
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
14
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
15
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
16
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
17
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
18
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
19
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
20
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान

महिलेचा ताबा सुटला अन् कारच्या कोलांटउड्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2022 11:11 PM

नाशिक : शरणपूर रोडवरील राजीव गांधी भवनासमोरून कॅनडा कॉर्नरकडे मार्गस्थ होताना महिला कारचालकाचा ताबा सुटल्याने मारुती सेलेरिओ कारने (एम.एच.१५ ईपी ४१५१) कोलांटउड्या घेतल्या. दरम्यान, मोटारीची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीस्वार जबर जखमी झाला. सुदैवाने या अपघातात कारचालक महिला व दुचाकीस्वार बालंबाल बचावले. अपघात इतका विचित्र होता की, कार मुख्य रस्त्यावरून व्यापारी संकुलाच्या वाहनतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर येऊन उलटली.

ठळक मुद्देशरणपूर रोड : महिला कारचालकासह दुचाकीस्वार बालंबाल बचावले

नाशिक : शरणपूर रोडवरील राजीव गांधी भवनासमोरून कॅनडा कॉर्नरकडे मार्गस्थ होताना महिला कारचालकाचा ताबा सुटल्याने मारुती सेलेरिओ कारने (एम.एच.१५ ईपी ४१५१) कोलांटउड्या घेतल्या. दरम्यान, मोटारीची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीस्वार जबर जखमी झाला. सुदैवाने या अपघातात कारचालक महिला व दुचाकीस्वार बालंबाल बचावले. अपघात इतका विचित्र होता की, कार मुख्य रस्त्यावरून व्यापारी संकुलाच्या वाहनतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर येऊन उलटली.याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवारी (दि.१५) संध्याकाळी ७.३० वाजताच्या सुमारास एका महिला कारचालकाने तिच्या ताब्यातील कार येथील एका बँकेसमोरून सुरू केली आणि कॅनडा कॉर्नरकडे जाण्यासाठी मुख्य रस्त्यावरून वळविली. यावेळी कारचालक महिलेने कार पुढे मार्गस्थ केली असता अचानकपणे कारचा वेग वाढला आणि त्यामुळे महिला चालकाची भंबेरी उडाली. कारला थांबवण्याच्या प्रयत्नात ब्रेकऐवजी ॲक्सिलेटरवर पाय पडला आणि वेग अजूनच वाढला. यामुळे गोंधळून गेलेल्या महिला चालकाने कारचा हॅन्ड ब्रेक ओढला आणि कारने कोलांटउड्या घेतल्या. येथील स्टेट बँकेच्या शेजारील व्यापारी संकुलातील वाहनतळात जाणाऱ्या रस्त्यावर कार जाऊन उलटली. दरम्यान, एका मोपेड दुचाकीला (एम.एच.१५एफ.एस ३२९०) धडक बसली. यामुळे दुचाकीस्वार जखमी झाला. त्याच्या डोक्यात हेल्मेट असल्याने डोके सुरक्षित राहिले; मात्र पायाला गंभीर मार लागला. तसेच महिलेलाही किरकोळ मार लागला. प्रसंगावधान राखल्याने या विचित्र अपघातात जीवितहानी टळली. तसेच संध्याकाळची वेळ असल्याने रस्त्यावर वर्दळदेखील अधिक होती. यामुळे अन्य वाहनांना धडक बसण्याचा धोका निर्माण होऊन मोठा अनर्थ घडला असता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याप्रकरणी उशिरापर्यंत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. महिला कारचालकासह जखमींची नावे समजू शकलेली नाही.पोलिसांची तत्परता अन् बघ्यांची गर्दीकार विचित्र पद्धतीने उलटल्याने त्याभोवती बघ्यांनी गर्दी केली होती. रस्त्याने ये-जा करणारे वाहनचालकांनीही वाहने थांबविल्याने वाहतूक कोंडी झाली. या घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बघ्यांची झालेली गर्दी पोलिसांनी पांगविली आणि त्यामुळे खोळंबलेली वाहतूकही सुरळीत केली. तसेच जखमी युवकाला स्थानिक नागरिकांच्या मदतीने जवळील खासगी रुग्णालयात पोलिसांनी प्रथमोपचाराकरिता हलविले.

टॅग्स :city chowkसिटी चौकAccidentअपघात