मनमाड : मनमाड नांदगाव रस्त्याने जात असलेल्या दुचाकीवर आज गुरुवारी बुरकूलवाडी परिसरात बाभळीचे झाड कोसळून झालेल्या अपघातमधे एक महिला ठार झाली आहे.लोहशिंगवे ता: नांदगाव येथील सुंदराबाई राजेंद्र हेंबाडे ही महिला येथून जवळच असलेल्या पानेवाडी येथे आपल्या माहेरी आली होती. आज दुपारनंतर आपल्या मुलाबरोबर मनमाड येथे जाउन नंतर लोहशिंगवे येथे जाण्यासाठी दुचाकीने निघाली. त्यांची दुचाकी विज मंडळाच्या सबस्टेशन जवळ आली असता अचानक रस्त्याच्या कडेचे पुरातन बाभळीचे झाड उन्मळून पडले. महिलेच्या अंगावर झाड पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी जखमी महिलेला येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अधिक रक्तस्त्राव झाल्याने महिलेचा मृत्यू झाला.दरम्यान रस्त्यावर कोसळेल्या झाडामुळे काही काळ वाहातुकीला अडथळा निर्माण झाल्याने वाहानांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. (वार्ताहर)
रस्त्यावर झाड कोसळल्याने महिला ठार
By admin | Updated: July 9, 2015 23:28 IST