दिव्यानी मंगलचंद जैन (२८ रा. पेठरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी प्रसन्ना सायखेडकर (रा. त्र्यंबकरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. सायखेडकर यांचे वडील सुभाष सायखेडकर हे बांधकाम व्यावसायिक असून विजय ललवाणी यांच्याशी त्यांची भागीदारी आहे. जय एन्टरप्रायझेस या फर्मच्या माध्यमातून मखमलाबाद येथील सर्व्हे नं. ४५ - २३४ वरील प्लॉट नं. २३ ते २७ या भूखंडावर साई रेसिडेन्सी नावाचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या इमारतीतील २३ सदनिका आणि २ व्यापारी गाळे हे सायखेडकर यांच्या मालकीचे तर उर्वरित सदनिका आणि गाळे भागीदार ललवाणी यांना देण्यात आल्या आहेत. सदर सदनिका आणि गाळे विक्री करण्यासाठी संशयित दिव्यानी जैन यांची नेमणूक करण्यात आली असून सदर महिलेने नोव्हेंबर २०२० ते जून २०२१ या कोविड काळात दहा ते बारा ग्राहकांचे येणारे पैसे कोटेशन प्रमाणे कंपनीला न भरता परस्पर रोख स्वरूपात स्वीकारून सुमारे २० लाखांचा अपहार केला. तसेच कंपनीने लावलेली कुलपे तोडून सदनिकांचा ताबा ग्राहकांना दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक वाय. एस. माळी करीत आहेत.
महिलेनेच घातला २० लाखाला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:16 IST