शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कारमधून येत परिसरात पायी फिरून महिला-मुलींना छेडणार्‍या विकृत तरुणास महिलांनी दिला ‘सॅण्डल’चा चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 18:53 IST

सुमारे दोन ते तीन महिन्यांपासून आत्मविश्वास सोसायटीच्या परिसरात एक विकृत प्रवृत्तीचा इसम रात्री-मध्यरात्रीच्या सुमारास चारचाकी कार (एम.एच१६ एबी ०४१३) मधून येऊन खाली उतरत परिसरातील महिला-मुलींची छेड काढून अश्लील चाळे करत असल्याचे महिलांच्या लक्षात आले.

ठळक मुद्दे‘अ‍ॅक्शन प्लॅन’नुसार पायतल्या जोड्यांनी चोपून काढले तीवारी हा इंदिरानगर परिसरातील सुशील अपार्टमेंटमधील रहिवासी

नाशिक : इंदिरानगर परिसरात यापुर्वी दुचाकीवरून येत एका तरुणाने महिला-मुलींची छेडछाड करत विकृत चाळे करण्याचा ‘उद्योग’ सुरू केला होता. यानंतर काही दिवसांपासून येथील राजसारथी सोसायटी, आत्मविश्वास सोसायटीच्या परिसरात एक इसम चारचाकीमधून येऊन महिला-मुलींची छेड काढत विकृत चाळे करत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर महिलांनी त्याला चांगलाच चोप देत पोलिसांच्या हवाली केले.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुमारे दोन ते तीन महिन्यांपासून आत्मविश्वास सोसायटीच्या परिसरात एक विकृत प्रवृत्तीचा इसम रात्री-मध्यरात्रीच्या सुमारास चारचाकी कार (एम.एच१६ एबी ०४१३) मधून येऊन खाली उतरत परिसरातील महिला-मुलींची छेड काढून अश्लील चाळे करत असल्याचे महिलांच्या लक्षात आले. त्यानंतर सदर बाब दक्ष नागरिकांनी पोलीसांच्या निदर्शनास आणून दिली; मात्र पोलिसांना तो मिळून आला नाही. अखेर महिलांनी त्याच्यावर पाळत ठेवून ‘अ‍ॅक्शन प्लान’ रचला. दरम्यान, विकृत इसम राजेंद्रकुमार तीवारी (३२) हा परिसरात नेहमीप्रमाणे आला आणि वाहनातून उतरून चाळे करु लागला. अश्लील नजरेने महिला-मुलींकडे बघून हावभाव करत असल्याचे लक्षात आल्यानंतर एका महिलेने त्याला हटकले. यावेळी तीवारी याने तिचा हात धरून जवळ ओढण्याचा प्रयत्न केला; मात्र सदर बाब परिसरातील अन्य महिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला धरून ‘अ‍ॅक्शन प्लॅन’नुसार पायतल्या जोड्यांनी चोपून काढले. तीवारी हा इंदिरानगर परिसरातील सुशील अपार्टमेंटमधील रहिवासी असून महिलांनी त्याला पोलिसांच्या हवाली केले आहे. पोलिसांनी त्याची कार जप्त केली असून अधिक तपास इंदिरानगर पोलीस ठाणे करीत आहेत