शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सव्वादोन लाख शिधापत्रिका आधारविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:58 IST

सार्वजनिक वितरणप्रणाली व्यवस्थेंतर्गत गरीब व गरजू व्यक्तींना धान्य पुरवठा केला जातो. यात जिल्ह्यातील सात लाख ५६ हजार ६२७ शिधापत्रिकांची लिंकिंग आधारशी करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, अद्यापही दोन लाख २५ हजार शिधापत्रिका आधार कार्डाशी संलग्न झालेल्या नसून अपग्रेडेशनचे काम वेगवेगळ्या तांत्रिक अडचणींमुळे मंदगतीने सुरू असल्याने उर्वरित आधार कार्ड संलग्निकरणासाठी सहा ते सात महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

नाशिक : सार्वजनिक वितरणप्रणाली व्यवस्थेंतर्गत गरीब व गरजू व्यक्तींना धान्य पुरवठा केला जातो. यात जिल्ह्यातील सात लाख ५६ हजार ६२७ शिधापत्रिकांची लिंकिंग आधारशी करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, अद्यापही दोन लाख २५ हजार शिधापत्रिका आधार कार्डाशी संलग्न झालेल्या नसून अपग्रेडेशनचे काम वेगवेगळ्या तांत्रिक अडचणींमुळे मंदगतीने सुरू असल्याने उर्वरित आधार कार्ड संलग्निकरणासाठी सहा ते सात महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. जिल्हा पुरवठा कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेच्या माध्यमातून गरीब व गरजू लोकांना धान्याचे व रॉकेलचे वितरण करण्यात येत असते. राज्य शासनाने अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत राज्यातील सर्वच शिधापत्रिकाधारकांचे कार्ड आधार कार्डाशी संलग्न करण्याचे काम हाती घेतले असून, जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब लाभार्थींसह अन्य योजनेअंतर्गत एकूण शिधापत्रिकाधारकांची संख्या ७ लाख ५६ हजार ६२७ इतकी आहे. यात अंत्योदय बीपीएल व के शरी शिधापत्रिकांतून प्राधान्यक्रमाचे लाभार्थ्यांचा समावेश असून, यापैकी ५ लाख १० हजार शिधापत्रिका आधारकार्डाशी लिंक झाले आहेत. उर्वरित २ लाख २५ अद्यापही आधारकार्डाशी लिंकिंग झालेले नाही. जिल्ह्णात महिन्याला सरासरीत २५ ते ३० हजार शिधापत्रिकांचे संलग्नीकरण व दुरुस्तीचे काम सुरू असून, या गतीनेच संलग्नीकरणाचे काम सुरू राहिल्यास संलग्नीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याची प्रक्रिया जवळपास सहा ते सात महिने चालण्याची शक्यता व्यक्त होत आहे.पाच लाख शिधापत्रिका संलग्नजिल्ह्यात एकूण साडेसात लाख शिधापत्रिका असून, पाच लाख शिधापत्रिका आधारशी लिंक झाल्या आहेत. परंतु अद्यापही सव्वादोन लाख शिधापत्रिकांचे संलग्नीकरण व दुरुस्तीचे काम सुरू आहे. परंतु याचा धान्य पुरवठ्यावर कोणताही परिणाम झालेला नसून सर्व ७ लाख ५६ हजार ६२७ लाभार्थींना पुरवठा करण्यात येत आहे. यात आधार लिंक नसलेल्या; परंतु लाभार्थी असलेल्या शिधापत्रिकाधारकांचाही समावेश असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सोपान कासार यांनी दिली.