शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिंड्यांविना यंदा त्र्यंबकच्या वाटा सुन्यासुन्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 16:31 IST

देवगांव : दरवर्षीप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा रविवार (दि.७) पासून सुरू होत आहे. मात्र, यंदा कोरोनामुळे यात्रा रद्द करण्यात आल्याने त्र्यंबकच्या वाटेवर शुकशुकाट दिसून येत आहे. यात्रा रद्द करतानाच संत निवृत्तीनाथ मंदिर परिसरात संचारबंदी लागू केल्याने यावर्षी दिंड्यांची संख्या घटली आहे. मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत दिंड्या त्र्यंबककडे मार्गस्थ होत असल्या तरी त्यांनाही मर्यादा घालण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देरस्त्यांवर शुकशुकाट : यात्रा रद्द झाल्याने परंपरेत खंड

देवगांव : दरवर्षीप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा रविवार (दि.७) पासून सुरू होत आहे. मात्र, यंदा कोरोनामुळे यात्रा रद्द करण्यात आल्याने त्र्यंबकच्या वाटेवर शुकशुकाट दिसून येत आहे. यात्रा रद्द करतानाच संत निवृत्तीनाथ मंदिर परिसरात संचारबंदी लागू केल्याने यावर्षी दिंड्यांची संख्या घटली आहे. मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत दिंड्या त्र्यंबककडे मार्गस्थ होत असल्या तरी त्यांनाही मर्यादा घालण्यात आल्या आहेत.यात्रेसाठी दरवर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक पायी दिंड्यांसह वारकरी, भक्तजण ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय जय रामकृष्ण हरीचा जयघोष करीत त्र्यंबककडे मार्गक्रमण करतात. यात्रेच्या तीन-चार दिवस अगोदरच त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या रस्त्यांवरून जाणाऱ्या दिंड्यांमुळे वातावरण भावभक्तिमय होऊन जाते. टाळ-मृदुंगाच्या गजराने व माऊलीच्या भजनाने येथील रस्ते दुमदुमून जातात. तसेच रस्त्यांवरील गावामध्ये दिंड्या मुक्कामास थांबून तेथील वातावरण भक्तिमय करतात. यात स्थानिक नागरिकही सहभागी होऊन वारकऱ्यांची सेवा करतात. मात्र, यंदा कोरोनामुळे पंढरपूरसह आळंदीच्याही यात्रा रद्द झाल्या आहेत.दरवर्षीप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा रविवारपासून सुरू होत आहे. पण त्र्यंबकनगरीच्या वाटा मात्र यंदा सुन्याच आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव जरी ओसरत असला तरी खुल्या यात्रेला अजूनही परवानगी मिळालेली नाही. प्रशासनाकडून वेळोवेळी गर्दी टाळण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. तसेच त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथ मंदिर परिसरात तीन दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत गर्दी टाळण्यासाठी अनेक दिंड्या यंदा रद्द करण्यात आल्या असल्याचे वारकरी सांगत आहेत. मात्र, वारीची परंपरा अखंडित राहावी म्हणून दिंडीतील काही मोजकेच वारकरी देवगांवमार्गे त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ होताना दिसत आहेत.वारकरी मंडळींचा प्रतिसादयात्रेच्या परिसरात गर्दी टाळण्यासाठी वारकरी दर्शन घेऊन मुक्कामास न राहता लगेचच परततांना दिसत आहेत. रस्त्याने जाताना वारकऱ्यांसाठी स्थानिक होतकरू सांप्रदायिक नागरिक फळे व जेवणाची व्यवस्था करत आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून नियमितपणे जाणाऱ्या दिंड्या आज तुरळक वारकऱ्यांनी दिसत आहेत. दिंडीत फार तर पाच सहाच वारकरी दिसतात. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेच्या तीन-चार दिवसांपूर्वी दिंडी सोहळ्याची गर्दी खूप असते. यंदा मात्र, दिंडी सोहळे तुलनेत कमी आहेत.- इंदूबाई रोकडे, वारकरी, देवगांव

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरTempleमंदिर