शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या दीड तासात शहर जलमय

By admin | Updated: June 15, 2017 01:03 IST

कोसळधार : रस्त्यावर साचले तळे, अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; तळमजले पाण्यात, बुधवार बाजारावर पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटासह बुधवारी (दि.१४) झालेल्या मुसळधार पावसाने नाशिककरांची त्रेधातिरपिट उडविली. शहरातील सर्वच रस्ते जलमय झाले होते, तर व्यापारी संकुलांसह रहिवासी सोसायट्यांचे तळमजले पाण्यात बुडाल्याने नागरिकांचे हाल झाले. शहरासह उपनगरीय भागातील पावसाळी भूमिगत गटारी पूर्णपणे तुंबल्याने शहरातील संपूर्ण रस्तेपाण्याखाली गेले होते.संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास शहरासह उपनगरीय भागांमध्ये ढगांचा गडगडाट सुरू झाला, याबरोबरच वाराही सुटला आणि पावसाला सुरुवात झाली. अवघ्या काही मिनिटांतच पावसाने जोर धरला. मुसळधार पावसाला शहर व परिसरात सुरुवात झाल्याने अर्ध्या तासातच सर्व भागातील रस्ते जलमय झाले होते. तसेच इमारतींचे तळमजले पाण्याने तुडुंब भरल्याने व्यावसायिकांसह नागरिकांची धावपळ झाली. बुधवारचा आठवडे बाजार असल्यामुळे गोदाकाठावरील विक्रेत्यांबरोबरच नागरिकांचे मोठे हाल झाले. विक्रेत्यांचे धान्य, भाजीपाला पाण्यात वाहून गेला, तसेच काही विक्रेत्यांचे पैशांचे गल्लेही वाहून गेले. तसेच गोदाकाठाभोवती असलेल्या दुचाकीदेखील पाण्यात वाहून गेल्याचे चित्र यावेळी पहावयास मिळाले. धान्यविक्रेत्यांचे धान्याची पोती वाहून गेली. पावसाचा जोर जरी जास्त असला तरी गोदाकाठावरील भुयारी गटारीचे चेंबर तुडुंब भरून वाहत होते. गटारी व नाल्याचे सांडपाणी मोठ्या प्रमाणावर वाहू लागल्याने बाजारात दुर्गंधीयुक्त पाण्याचे पाट वाहू लागल्याने नागरिकांनी महापालिकेच्या गलथान कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला. शहरातील गंगापूररोड भागातही केटीएचएम कॉलेजसमोर एका बाजूला तळे साचल्याने रस्ता बंद करण्यात आला. आयटीआय पुलाजवळ रस्त्यावरील पाण्यामुळे तासभर वाहतूक कोंडी झाली होती. सायंकाळच्या वेळी शासकीय आस्थापना आणि खासगी कार्यालयांची सुटी झाल्याने चाकरमान्यांचे हाल झाले. इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस होईल याची कल्पना नसल्याने तयारी नसलेल्या नागरिकांना विविध व्यापारी संकुले आणि अन्य कार्यालयाचा आसरा घ्यावा लागला. अनेकांच्या दुचाकी तळ्यांमध्ये अडकल्याने त्यांना त्या बाहेर काढणे मुश्कील झाले होते. मुसळधार पावसामुळे अनेक मार्गांवरील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती.पालिकेचे मुख्यालय असलेल्या शरणपूररोडवरील राजीव गांधी भवनसमोर सुमारे अर्धा फूट इतके पाणी साचले होते. यामुळे सुयोजित ट्रेड संकुलातील तळमजले पाण्यात बुडाल्याने तळमजल्यावरील दुकानदारांचे हाल झाले. पालिकेच्या दारात पाण्याचा तलाव साचून रस्ता वाहतुकीसाठी बंद झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. या भागात नागरिकांनी चेंबर खुले करून दिल्याने काही प्रमाणात पाणी प्रवाही करण्यात आल्यानंतर नागरिकांना दिलासा मिळाला.