शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

२२ दिवसांत जिल्ह्यात ४३ टक्के वृक्षलागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 01:04 IST

राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत जिल्ह्याला १ कोटी ९२ लाख ३० हजार रोपे लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी १ कोटी २७ लाख ३४ हजार रोपे वनविभागाला लागवड करावयाची आहे.

नाशिक : राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत जिल्ह्याला १ कोटी ९२ लाख ३० हजार रोपे लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी १ कोटी २७ लाख ३४ हजार रोपे वनविभागाला लागवड करावयाची आहे. त्यापैकी ६० टक्के लागवड वनविभागाने पूर्ण केली, तर एकूण सरासरी ४३ टक्के लागवड जिल्ह्यात यशस्वीपणे करण्यात आली आहे.पावसाने अचानकपणे दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील पश्चिम विभागाच्या हद्दीतील तालुक्यांमध्ये वृक्षलागवडीला खोळंबा निर्माण झाला आहे. पावसाच्या उघडीपीमुळे ग्रामपंचायतींनीदेखील वृक्षारोपण थांबविले असून, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना केवळ १५ टक्क्यांपर्यंत वृक्षलागवडीचे उद्दिष्ट २२ दिवसांत गाठणे शक्य झाले.जुलै ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात वनविभाग, सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळ, ग्रामपंचायतींसह अन्य सरकारी व निमसरकारी संस्था मिळून १ कोटी ९२ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करावयाचे आहे. त्यापैकी ८८ लाख १९ हजार ७३६ रोपांची लागवड पूर्ण करण्यास वनविभागासह अन्य यंत्रणांना यश आले आहे.सामाजिक वनीकरणाने ६० टक्के, वनविकास महामंडळाने ४५ टक्के, तर ग्रामपंचायतीने १५ आणि अन्य यंत्रणांपैकी आरटीओने ५०, गृहखात्याने ५४, महापालिकेने २४ टक्के इतकी वृक्षलागवड केली आहे. क्रीडा विभाग अन्य यंत्रणांमध्ये आघाडीवर असून, उद्दिष्टाच्या९७ टक्क्यांपर्यंत लागवड पूर्ण केली आहे. अशी माहिती, सहायक सरंक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली़अभियानावर आॅनलाइन नियंत्रण३३ क ोटी रोपे लागवडीची मोहीम आॅनलाइन नियंत्रित केली जात आहे. यासाठी प्रत्येक जिल्हानिहाय ‘डेडिकेटेड सेल’ स्थापन करण्यात आला आहे. तसेच मोहीम अधिकाधिक पारदर्शीपणे राबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्हानिहाय लावलेली रोपे, खड्ड्यांची संख्या, तयार रोपांची संख्या आदी माहिती संकलित केली जात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.वन मंत्रालयाने ५० कोटी वृक्षलागवडीचा अखेरचा ३३ कोटी वृक्षारोपणाचा टप्पा यावर्षी राबविला.येत्या सप्टेंबर महिन्यात राज्यभरात एकूण ३३ कोटी रोपांची लागवड करण्याचे ‘टार्गेट’ पूर्ण केलेजाणार आहे.४राज्यात वृक्षाच्छादनाचे क्षेत्र वाढवून पर्यावरणाचा समतोल व निसर्गसंवर्धनासाठी मंत्रालयाकडून हे अभियान राबविले जात आहे. रोपांच्या जगण्याचेप्रमाण येत्या आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात मोजले जाणार आहे.पावसावरअभियानाचे यश४शहरासह जिल्ह्यात पर्जन्यमानाची स्थिती बिकट झाली असून, वृक्षारोपण अभियानाचे यश पावसाच्या प्रमाणावर अवलंबून आहे. कारण जिल्ह्यातील काही मोजकेच तालुक्यांत अद्याप चांगला पाऊस झाला आहे.४जुलै ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात वनविभाग, सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळ, ग्रामपंचायतींसह अन्य सरकारी व निमसरकारी संस्था मिळून १ कोटी ९२ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करावयाचे आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागNashikनाशिक