शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बॅँकांच्या हलगर्जीपणामुळे नाशिकचे हजारो पेन्शनधारक वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 18:49 IST

नाशिक जिल्ह्यात दरमहा सुमारे ३६ हजाराहून अधिक सेवानिवृत्त कर्मचा-याची पेन्शन कोषागार कार्यालयातून संबंधित कर्मचा-यांचे बॅँक खाते असलेल्या शाखेत वर्ग केली जाते.

ठळक मुद्देडिसेंबरचे पेन्शन बंद : निवृत्त वेतन कर्मचारीही त्रस्तबॅँकांनी हयातीचा दाखला देणा-या पेन्शनधारकांची यादी कोेषागार कार्यालयाला कळविलीच नाही

नाशिक : राज्य व केंद्र सरकारी सेवानिवृत्त कर्मचा-यांनी नोव्हेंबर महिन्यात आपल्या हयातीचे दाखले संबंधित बॅँकांकडे जमा करूनही निव्वळ बॅँकेच्या हलगर्जीपणामुळे त्याची माहिती जिल्हा कोषागार कार्यालयाला सादर न केल्याने जिल्ह्यातील पाच हजाराहून अधिक पेन्शनधारकांना डिसेंबर महिन्याची पेन्शन जानेवारीत मिळू शकणार नाही. वयोवृद्ध पेन्शन धारकांना नवीन वर्षातच बॅँकांच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे पाहून कोेषागार कार्यालयातील कर्मचारीही बॅँकांच्या त्रासाला कंटाळले आहेत.नाशिक जिल्ह्यात दरमहा सुमारे ३६ हजाराहून अधिक सेवानिवृत्त कर्मचा-याची पेन्शन कोषागार कार्यालयातून संबंधित कर्मचा-यांचे बॅँक खाते असलेल्या शाखेत वर्ग केली जाते. अशा बॅँकांची व त्यांच्या शाखांची संख्या सुमारे २५० च्या आसपास आहे. त्यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात संबंधित कर्मचाºयाने आपल्या हयातीचा पुरावा बॅँकेकडे वा कोषगार कार्यालयात सादर करणे बंधनकारक असते. त्यासाठी कोषागार कार्यालयाकडून आॅक्टोंबर महिन्यात सर्व बॅँका व त्यांच्या शाखांना पत्र व त्यांच्याकडील पेन्शनधारकांची यादी सादर करण्यात आली होती. नोव्हेंबर महिन्यात पेन्शन काढण्यासाठी बॅँकेत येणाºया पेन्शनधारकांकडून हयातीचा दाखला घेऊन त्याची यादी १ ते ५ नोव्हेंबर नंतर कोषागार कार्यालयाला सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. ५ नोव्हेंबर नंतर पेन्शन काढणाºया पेन्शनधारकांची दुसरी यादी २० नोव्हेंबर पर्यंत सादर करण्यात यावी असेही सांगितले होते. पेन्शनधारकांना नोव्हेंबर महिन्यात बॅँकेत व कोेषागार कार्यालयात हयातीचा दाखला सादर करावा लागतो याची पुरेपूर माहिती असल्यामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच पेन्शन धारकांनी आपले पुरावे बॅँकांकडे सादर केले आहेत. परंतु बॅँकांनी हयातीचा दाखला देणा-या पेन्शनधारकांची यादी कोेषागार कार्यालयाला कळविलीच नसल्याने ज्या पेन्शनधारकांचे हयातीचे दाखले मिळाले नाहीत अशा पेन्शनधारकांचे नोव्हेंबर पेड डिसेंबरची पेन्शनची रक्कम कोषागार कार्यालयाने काढली नाही. तत्पुर्वी कोेषागार कार्यालयाने वारंवार संबंधित बॅँकांना पत्रव्यवहार व दूरध्वनीवरून विनंती करूनही सुमारे २५ ते ३० बॅँकांनी माहिती न दिल्याने जवळपास पाच हजार पेन्शनधारकांना वर्षाच्या सुरूवातीलाच पेन्शन मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरूवारी काही पेन्शनधारकांनी स्वत:च कोषागार कार्यालयात संपर्क साधून बॅँकांनी माहिती दिली की नाही याची खात्री केली त्यावेळी उपरोक्त बाब स्पष्ट झाली आहे. आता बॅँकांनी पेन्शनधारकांची यादी जरी पाठविली तरी, फेब्रुवारी महिन्यातच दोन महिन्यांची पेन्शन कोषागार कार्यालयाकडून अदा केली जाणार आहे.

टॅग्स :bankबँकNashikनाशिक