सातपूर : नाशिक प्रोफेशनल क्रि केट लीग (एनपीसीएल) स्पर्धेत अटीतटीच्या लढतीत वॉर लॉर्ड्स इलेव्हन संघाने बाजी मारत विजेतेपद पटकावले, तर नमो इलेव्हन संघाला उपविजेता पदावर समाधान मानावे लागले. विजेत्या संघांना लोकमतचे सहाय्यक उपाध्यक्ष बी.बी. चांडक यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.सीए, सीएमए (सीडब्ल्यूए), सीएस, उद्योगपती, शिक्षक आणि व्यावसायिक, उद्योजक हे या संघांचे मालक होते. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत अटीतटीच्या अंतिम सामन्यात वॉर लॉर्ड्स इलेव्हन संघाने विजेतेपद पटकावले. नमो इलेव्हन संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. बक्षीस वितरण समारंभास आदित्य जाजू, प्रनील जैन उपस्थित होते. चांडक यांच्या हस्ते विजेता संघास ७,७७७ रुपये रोख, ट्रॉफी, पदक, तर उपविजेता संघास ५,५५५ रु पये रोख, ट्रॉफी,पदक देऊन गौरविण्यात आले. यावेळी विवेक जाधव, उमेश जाधव, हर्षल सुराणा, प्रीतम महूर, विशाल पोद्दार, आरीफ खान, नवनाथ गांगुर्डे, पंकज बोहरा, कार्तिक शाह आदी उपस्थित होते.फोटो :- नाशिक प्रोफेशनल क्रि केट लीग स्पर्धेतील वॉर लॉर्ड्स इलेव्हन संघाला प्रथम क्र मांकाचे पारितोषिक प्रदान करताना लोकमतचे सहाय्यक उपाध्यक्ष बी.बी. चांडक. समवेत आदित्य जाजू, प्रनील जैन, विशाल पोद्दार, नवनाथ गांगुर्डे, विवेक जाधव, उमेश जाधव, हर्षल सुराणा आदी.
एनपीसीएल क्रि केट स्पर्धेत वॉर लॉर्ड्स इलेव्हन संघ विजेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 14:25 IST
सातपूर : नाशिक प्रोफेशनल क्रि केट लीग (एनपीसीएल) स्पर्धेत अटीतटीच्या लढतीत वॉर लॉर्ड्स इलेव्हन संघाने बाजी मारत विजेतेपद पटकावले, तर नमो इलेव्हन संघाला उपविजेता पदावर समाधान मानावे लागले. विजेत्या संघांना लोकमतचे सहाय्यक उपाध्यक्ष बी.बी. चांडक यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
एनपीसीएल क्रि केट स्पर्धेत वॉर लॉर्ड्स इलेव्हन संघ विजेता
ठळक मुद्देमहात्मानगर मैदानावर एनपीसीएलच्या सहाव्या क्रि केट लीगचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथमच १२० खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. एकूण आठ संघ सहभागी झाले होते.