शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
IPL 2025 Playoffs Schedule : हार्दिकला 'एक्स' भेटणार! पंजाब-बंगळुरु थेट फायनल गाठण्यासाठी भिडणार
3
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
4
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
5
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
6
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
7
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
8
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
9
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
10
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
11
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
12
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
13
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
14
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
15
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
16
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
17
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
18
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
19
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
20
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले

वकील संघ अध्यक्षपदी पगार विजयी

By admin | Updated: July 23, 2014 00:33 IST

निवडणूक : उपाध्यक्षपदी राहुल दराडे, सचिवपदी योगेश गडाख विजयी

सिन्नर : येथील वकील संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अ‍ॅड. विलास पगार, उपाध्यक्षपदी राहुल दराडे, तर सचिवपदी योगेश गडाख विजयी झाले. येथील ९८ मतदार असलेल्या वकील संघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव या पदांसाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत वकील संघाच्या ९२ सदस्य मतदारांनी हक्क बजवाला. अध्यक्षपदासाठी अ‍ॅड. पगार व अ‍ॅड. पी. आर. कोकाटे व प्रभाकर देशमुख यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली. त्यात अ‍ॅड. विलास पगार ४९ मते मिळवून १४ मतांनी विजयी झाले. उपाध्यक्षपदासाठी दुरंगी लढत झाली. त्यात राहुल दराडे ५३ मते मिळवून विजयी झाले. सचिवपदासाठी दुरंगीच लढत रंगली. त्यात योगेश गडाख यांनी ५४ मते मिळवत विजय मिळविला, तर खजिनदारपदी यापूर्वी देवेंद्र खरात हे बिनविरोध निवडून आले आहे. तसेच सदस्यपदासाठीही शरद चतूर, विलास खैरानार, अजित कोकाटे, सुशील सांगळे, संदेश शिंदे, अनिल पालवे, स्वाती मोरे यांचीही यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिरीष बर्वे, शिवराज नवले यांनी काम पाहिले. तर निवडणूक प्रक्रिया शिवाजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या निवडणुकीमुळे बार असोसिएशनची सूत्रे पुढील तीन वर्षांसाठी तरुणांच्या हाती आली असून, सर्व विजयी वकिलांचे स्वागत होत आहे. (वार्ताहर)