शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वादळी वारा; वीज कोसळून आणखी तिघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 01:38 IST

जिल्ह्यात वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या पावसाने सलग तिसºया दिवशीही आपली हजेरी कायम ठेवली असून, मंगळवारी बागलाण, देवळा व दिंडोरी तालुक्यांत वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

नाशिक : जिल्ह्यात वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या पावसाने सलग तिसºया दिवशीही आपली हजेरी कायम ठेवली असून, मंगळवारी बागलाण, देवळा व दिंडोरी तालुक्यांत वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  गेल्या तीन दिवसांत जिल्ह्णात अवकाळी पावसाने  आठ बळी घेतले, तर मोठ्या प्रमाणावर पशुधनाचीहीहानी झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाचेही नुकसान झाले आहे.  मंगळवारी जिल्ह्णातील मालेगाव, दिंडोरी, बागलाण, कळवण, सिन्नर तालुक्यात अवकाळी पावसाने पुन्हा झोडपून काढले आहे. दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथे दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास वादळी वाºयासह विजेचा कडकडाट करीत पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी गावाच्या उत्तरेला न्याहाराई माता मंदिराचे पुजारी संपत उदार (६५) या वृद्धाच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दिंडोरी तालुक्यातील खेडगाव, वणी भागांत दुपारी ३ वाजेनंतर जोरदार पाऊस सुरू झाला असून, शेतकºयांची धावपळ उडाली आहे, तर बागलाण तालुक्यातील जायखेडा परिसरात योेगेश बापू शिंदे (३२) हा तरुण मेंढ्या चारत असताना अचानक विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यात झाडाखाली आश्रय घेतलेल्या योगेश शिंदे याच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. योेगेश हा साक्री तालुक्यातील आयाने येथील रहिवासी आहे. या दुर्घटनेनंतर त्याला तातडीने त्याच्या गावी नेण्यात आले. कळवण तालुक्यातील मौजे बिजोरे येथील शेतकरी विलास बबन वाघ यांच्या म्हशीच्या अंगावर दुपारी ३ वाजता वीज पडल्याने दगावली आहे. देवळा तालुक्यातील वाजगाव येथे अंगावर वीज पडून हौसाबाई कुंवर (७१) ही वृद्धा जागीच ठार झाली तर तिच्या शेजारीच बांधलेली शेळी देखील दगावली आहे.गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्णातील हवामानात कमालीचा बदल झाला असून, उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मंगळवारी सकाळपासूनच आकाशात ढगांनी गर्दी केली. मालेगाव येथे सोमवारी रात्री वादळी वाºयामुळे झाड कोसळून विकास अग्रवाल यांचा मृत्यू झालेला असताना मंगळवारी सकाळी ८ वाजता अवकाळी पावसाने शहरवासीयांना झोडपून काढले. रविवारी दिंडोरी तालुक्यात तीन व चांदवड तालुक्यात एक अशा चौघांचा वीज कोसळून मृत्यू झाला असून, त्यापाठोपाठ पुन्हा वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे.अवकाळी पावसाने सटाणा, मालेगाव, सिन्नर, नाशिक व निफाड तालुक्यांमधील ६८ गावे बाधित झाले असून, सुमारे २१ घरांची पडझड होऊन नऊ जनावरे दगावली.

टॅग्स :agricultureशेतीDeathमृत्यू