शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
3
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
4
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
5
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
6
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
7
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
8
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
9
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
10
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
11
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
12
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
14
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
15
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
16
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
17
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
18
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
19
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
20
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!

नागमोडी वळणे अन् उंचवट्यांवर रविवारी रंगणार थरार

By admin | Updated: May 15, 2014 00:08 IST

नाशिककरांना संधी : एमआरएफ सुपरक्रॉस मोटारसायकल राष्ट्रीय चॅम्पियनशिप

नाशिककरांना संधी : एमआरएफ सुपरक्रॉस मोटारसायकल राष्ट्रीय चॅम्पियनशिप नाशिक : शहरातील अनेक रस्त्यांवर मोटारसायकलवर कसरती करताना युवक नेहमीच दिसत असले, तरी येत्या १७ व १८ तारखेला अत्यंत नागमोडी वळणाच्या वेड्यावाकड्या आणि उंचवट्यांच्या रस्त्यांवरची एमआरएफ सुपरक्रॉस राष्ट्रीय मोटारसायकल स्पर्धेचा थरार नाशिककरांना अनुभवता येणार आहे. सदर स्पर्धेसाठी देशभरातील नामांकित स्पर्धक सहभागी होत असून, यात पहिल्यांदाच १५ वर्षांखालील दुचाकीचालकांचा गटही सहभागी होणार आहे.एमआरएफ व गॉडस्पीड यांच्या वतीने नाशिक ऑटोमोटिव्ह स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे (नासा) सदरची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा रविवारी दुपारी २ वाजता पाथर्डी गावालगतच्या गौळाणे येथील कुटेज् सुपरक्रॉस ट्रॅकवर रंगणार असून, त्यापूर्वी शनिवारीही सरावाचे प्रदर्शन असणार आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातून प्रवेशिका दाखल झाल्या असून, यात नाशिकसह पुणे, मंुबई, औरंगाबाद, नागपूर, नवी दिल्ली, भोपाळ, हैदराबाद, जयपूर, बंगळुरूचे नामांकित स्पर्धक सहभागी झाले आहेत. सदर स्पर्धेचा नाशकात होणारा हा पहिला टप्पा असेल, तर दुसर्‍या टप्प्याची स्पर्धा पुण्यात रंगणार आहे. पत्रकार परिषदेला नासाचे सरचिटणीस मनीष चिटको, गॉडस्पीडचे श्याम कोठारी, युवराज पवार, सूरज कुटे आदि उपस्थित होते. असे आहेत स्पर्धेतील गटफॉरेन ओपन क्लास, प्रायव्हेट फॉरेन ओपन क्लास, इंडियन एक्सपर्ट क्लास, इंडियन एक्सपर्ट क्लास, प्रायव्हेट एक्सपर्ट क्लास, नोव्हीक क्लास आणि ज्युनिअर क्लास असे सात गट आहेत. त्याचप्रमाणे १५ वयोगटातील मुलांसाठी २६० सीसीपर्यंतच्या मोटारसायकलच्या प्रदर्शनीय स्पर्धेचाही यात समावेश आहे. शनिवारी सरावाचे प्रदर्शनमुख्य स्पर्धा रविवारी दुपारी २ वाजता होणार असून, त्यापूर्वी प्रत्यक्ष ट्रॅकवर स्पर्धेतील सहभागी चालकांना शनिवारी सराव करता येणार आहे. प्रत्यक्ष स्पर्धेप्रमाणेच सरावाची तयारी स्पर्धक करणार असल्याने ते पाहण्याची संधीही नाशिककरांना उपलब्ध होणार आहे. अरविंद, नोहा असतील आकर्षणगतस्पर्धेतील विजेते बंगळुरूचा के. पी. अरविंद, केरळचा हॅरिथ नोहा व बंगळुरूचा सी. एस. संतोष हे सदर स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरणार आहेत. भरधाव वेगात कसरती करीत दुचाकी चालविणार्‍या या चालकांचा नाशकात मोठा प्रशंसक वर्ग आहे.