कांदा शेड, घरांचे पत्रे उडालेपिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत परिसरात वादळी पावसाने प्रचंड नुकसान झाले असून, शहरातील बहुतांशी कांदा शेड, घरांचे पत्रांचे नुकसान झाले. सुमारे चार कोटी रुपयांचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.पिंपळगाव बसवंत परिसरात दुपारी वादळी वार्यासह पावसाने हैदोस घातला असून, पिंपळगाव बसवंत येथील कांदा व्यापार्यांचे २५ शेड पडल्याने संपूर्ण कांदा भिजला गेल्याने सुमारे दोन कोटींची हानी झाल्याची माहिती बाजार समितीचे संचालक अतुल शहा यांनी दिली असून, पिंपळगाव बसवंत निफाड रोडवर वडांचे झाडे पडल्याने निफाड पिंपळगाव रस्ता सुमारे पाच तास बंद होता. जेसीबीच्या सहाय्याने झाडाच्या फांद्या बाजूला करण्याचे काम चालू होते. गेल्या १५ दिवसांत तीन वेळा वादळी पावसाने पिंपळगाव बसवंत परिसरात नुकसान झाले असून, पिंपळगाव बाजार समितीमध्ये दाखल झालेले ६०० वाहनांसह कांद्याचा लिलाव झाला होता. १०० वाहने बाकी असताना वादळी पावसाने हैदोस घातला असून, व्यापारी वर्गाचे खळ्यावर शिल्लक असलेला कांदा व आज खरेदी केलेला जवळपास ११९०० क्विंटल माल ओला झाल्याने संपूर्ण नुकसान झाले आहे. बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांनी पाहणी करून शिल्लक राहिलेल्या ट्रॅक्टरचालकांना व शेतकर्यांना रात्री जेवणाची व राहण्याची व्यवस्था बाजार समितीने केली.बाजार समिती बंदकांदा व्यापार्यांचे शेडचे नुकसान झाल्याने कांदा ठेवण्यास जागा नाही तसेच आज झालेल्या पावसाने कांद्याचेही नुकसान झाले असून, पुढील सूचना येईपर्यंत व्यापारी असोसिएशनने कांदा मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पिंपळगाव परिसरात वादळी पाऊस
By admin | Updated: June 3, 2014 01:41 IST