शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी एक खिडकी योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 00:08 IST

वैतरणानगर : कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनांची मार्गदर्शक तत्वे महाराष्ट्र शासनाने जाहीर केली आहेत. शेतकर्यांचा नियमित वावर असणारे इगतपुरी येथील उपअधीक्षक भूमि अभिलेख हे प्रमुख कार्यालय आहे. या कार्यालयामार्फत देण्यात येणार्या विविध सुविधांसाठी एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

वैतरणानगर : कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनांची मार्गदर्शक तत्वे महाराष्ट्र शासनाने जाहीर केली आहेत. शेतकर्यांचा नियमित वावर असणारे इगतपुरी येथील उपअधीक्षक भूमि अभिलेख हे प्रमुख कार्यालय आहे. या कार्यालयामार्फत देण्यात येणार्या विविध सुविधांसाठी एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.कोरोना रोखण्यासाठी सर्व सुविधांमध्ये जनसंपर्क टाळण्यासाठी प्रभावी नियोजन केले असल्याची माहिती उपअधीक्षक दत्तात्रय वाघ, मुख्यालय सहाय्यक मिलिंद जगताप यांनी दिली. इगतपुरी तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांनी सुविधांचा लाभ घेताना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. इगतपुरी येथील उप अधीक्षक भूमी अभिलेख या कार्यालयात शेतकर्यांसह नागरिकांचे महत्त्वपूर्ण काम नेहमीच असते. त्यामुळे या कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढून जनसंपर्क होतो. जागेअभावी सामाजिक अंतर पालन करण्यास अडथळा येतो. या पाशर््वभूमीवर महाराष्ट्र शासनाने मार्गदर्शक तत्वप्रणाली ठरवून दिली आहे. त्यानुसार मोजणी अर्ज देणे, नकला देणे घेणे, सिटी सर्व्हे उतारे, मालकी हक्काची नांवे लावणे, मिळकतीचे उतारे घेणे, माहिती मिळविण्यासह विविध अर्जाचे टपाल देणे आदी कामांसाठी एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. यासाठी चार खिडक्यांमध्ये कामकाज सुरू केले आहे. ह्या खिडक्यांमधून प्रशासकीय सुलभता व व सामाजिक अंतराचे पालन होत असल्याचे दिसत आहे. खिडकी क्र मांक 1 वर मोजणी अर्ज, शासकीय रक्कमा चलने, खिडकी क्र मांक 2 वर टपाल, खिडकी क्र मांक 3 वर नकला विभाग तर खिडकी क्र मांक 4 वर सिटी सर्व्हे उतारे व अन्य सेवा उपलब्ध केल्या आहेत. शेतकरी व अर्जदारांनी समक्ष संपर्क कमी करणेसाठी स्वत:चा व्हाटसअ‍ॅप क्र मांक, ई-मेल क्र मांक अर्जावर नमूद केल्यास अर्जाबाबत पुढील माहितीची सूचना दिली जाणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक