शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

वाऱ्याचा वाढला वेग; पावसाची हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 01:26 IST

गेल्या वर्षाच्या तुलनेत नाशिककरांना यंदा मान्सूनची अधिक प्रतीक्षा करावी लागणार आहे. मागील वर्षी १२ ते २३ जूनच्या दरम्यान नाशिक जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला होता; मात्र यावर्षी अद्याप हवामान खात्याकडून नाशिकमध्ये मान्सून सक्रिय होण्याच्या तारखांविषयीचा अंदाज जाहीर करण्यात आलेला नाही.

नाशिक : गेल्या वर्षाच्या तुलनेत नाशिककरांना यंदा मान्सूनची अधिक प्रतीक्षा करावी लागणार आहे. मागील वर्षी १२ ते २३ जूनच्या दरम्यान नाशिक जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला होता; मात्र यावर्षी अद्याप हवामान खात्याकडून नाशिकमध्ये मान्सून सक्रिय होण्याच्या तारखांविषयीचा अंदाज जाहीर करण्यात आलेला नाही.  मागील वर्षी मान्सूनपूर्व पावसाने २ व ३ जून रोजी जोरदार सलामी दिली होती. त्यानंतर मान्सूनचा पहिला पाऊस १२ जून रोजी झाला होता. ११ ते १२ जूनच्या दरम्यान २४ तासांत ३९.१ मिमी इतका पाऊस शहरात झाला होता. या दरम्यानच मान्सून सक्रिय झाल्याची माहिती हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आली होती. १३ जूनपर्यंत नाशिकमध्ये मागील वर्षी ६१ मिमीपर्यंत पाऊस झाला होता. यंदा मात्र या सर्व तारखा कोरड्या गेल्या आहेत. अरबी समुद्रात मान्सून पोहचला असला तरी पुढे मान्सून सरकण्यास पूरक अशी नैसर्गिक स्थिती निर्माण झाली नसल्याने विलंब होत असल्याचे कारण हवामान विभागाने सांगितले आहे.  पुढील तीन ते चार दिवस केवळ सोसाट्याचा वारा अनुभवयास येण्याची नाशिककरांना शक्यता  आहे.  मागील तीन दिवसांपासून शहरात वाºयाचा वेग प्रचंड वाढला आहे. पहाटेपासून संध्याकाळपर्यंत वाºयाचा वेग वाढलेला असतो आणि रात्री जोर कमी होत असल्याचे निरीक्षण पेठरोडवरील हवामान केंद्राने नोंदविले आहे. मंगळवारी (दि.१२) ११ किमी प्रति तास वेगाने शहरात वारा वाहत होता. बुधवारी मात्र वाºयाचा वेग अधिक वाढल्याची नोंद हवामान केंद्राने केली.मान्सूनपूर्व पावसाचाही दगामागील वर्षी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली होती. १० जूनपर्यंत दोन ते तीन वेळा जोरदार पाऊस शहरात व जिल्ह्यात झाला होता. त्यानंतर १२ जूनपासून जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाल्याने नाशिककरांना पावसाची फारशी प्रतीक्षा करावी लागली नव्हती; यावर्षी अरबी समुद्रातून मान्सून पुढे सरकण्यासाठी लागणारी पूरक अशी परिस्थिती निर्माण न झाल्याने यंदा नाशिककरांना मान्सूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे. यावर्षी मान्सूनला होणारा विलंब आणि मान्सूनपूर्व पावसानेही दगा दिला आहे.

टॅग्स :Rainपाऊस