शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

२२ हजार कोटींचा अहवाल पाठविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:45 IST

दिल्ली येथे झालेल्या आॅल इंडिया पेन्शनर्स कोआॅर्डिनेशन अधिवेशनानंतर पेन्शनर्सच्या प्रश्नांवर अनेक पक्षांच्या खासदारांनी बाजू मांडण्याची ग्वाही दिली आहे. यावेळी केंद्रीयमंत्री संतोषकुमार गंगवार यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केल्यानंतर पेन्शनर्सचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी सुमारे २२ हजार कोटींच्या निधीची आवश्यकता असल्याचा अहवाल अर्थ मंत्रालयाकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

नाशिक : दिल्ली येथे झालेल्या आॅल इंडिया पेन्शनर्स कोआॅर्डिनेशन अधिवेशनानंतर पेन्शनर्सच्या प्रश्नांवर अनेक पक्षांच्या खासदारांनी बाजू मांडण्याची ग्वाही दिली आहे. यावेळी केंद्रीयमंत्री संतोषकुमार गंगवार यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केल्यानंतर पेन्शनर्सचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी सुमारे २२ हजार कोटींच्या निधीची आवश्यकता असल्याचा अहवाल अर्थ मंत्रालयाकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी खासदार हेमंत गोडसे यांनीदेखील मंत्री महोदयांच्या सचिवांना भेटून सदर अहवालाची मागणी केली. अहवालानंतर भूमिका निश्चित करण्याचा निर्णय समन्वय समितीने जाहीर केला. गेल्या ७ आणि ८ मार्च रोजी दिल्लीत झालेल्या पेन्शनर्स समिती समन्वय समितीच्या अधिवेशनानंतर पेन्शनर्सच्या विषयाला चालना मिळाली असल्याचा दावा समितीच्या वतीने करण्यात आला आहे. या अधिवेशनासाठी खासदार संपत, टी. के. इलगव्हाण, श्रीनिवास रेड्डी, ईटी. महम्मद बशीर, सदाशिव लोखंडे, राजू शेट्टी, रामदास आठवले यांनी अधिवेशनात जाऊन शिष्टमंडळाची भेट घेतली. या खासदारांनीदेखील अर्थमंत्रालयाशी चर्चा करण्याचे आश्वासन देत मागण्यांची माहिती जाणून घेतली. यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या सचिवांशी शिष्टमंडळासह चर्चा केली. यावेळी सचिव मनू टेटीवाल यांनी पेन्शनर्सच्या मागण्यांसाठी सुमारे २२ हजार करोडचा अहवाल अर्थ मंत्रालयाकडे पाठविल्याचे शिष्टमंडळाला सांगितले. खासदार गोडसे यांनी अहवालाच्या प्रतीची मागणी यावेळी केली. शिष्टमंडळात सुधाकर गुजराथी, चेतन पणेर, नामदेव बोराडे, विष्णुपंत गायखे, के. एस. वारुंगसे, लक्ष्मण बोडके, शिवराम गायधनी, मधुकर मुठाळ, शंकरराव रोकडे, भाऊसाहेब आडके यांचा समावेश होता.ंमोर्चात अनेक राज्यांचे कर्मचारी सहभागी मंडी हाऊस ते संसदेपर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात पेन्शनर्स सहभागी झाले होते. त्यात प्रामुख्याने केरळ, आंध्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, कर्नाटक, एमपी, यूपी, तेलंगणा महाराष्टÑातील सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी झालेल्या मेळाव्यात दहा खासदारांच्या शिष्टमंडळाने पेन्शनर्सचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :Nashikनाशिक