शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दबावाने निवडणुकीबाबत निर्णय घेणार नाही : कोंडीजीमामा आव्हाड  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 01:14 IST

नाशिक जिल्ह्यात सुमारे साडेसात हजार सभासद असलेल्या क्रांतिवीर व्ही. एन. नाईक संस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ संपण्यास अजून दोन महिन्यांपेक्षा अधिक वेळ असून, त्याबाबतचा निर्णय घेण्यास अजून बराच कालावधी आहे.

सिडको : नाशिक जिल्ह्यात सुमारे साडेसात हजार सभासद असलेल्या क्रांतिवीर व्ही. एन. नाईक संस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ संपण्यास अजून दोन महिन्यांपेक्षा अधिक वेळ असून, त्याबाबतचा निर्णय घेण्यास अजून बराच कालावधी आहे. विद्यमान संचालक मंडळाने निवडणुकीचा कोणताही धसका घेतलेला नसून या संदर्भात लवकरच स्वतंत्र बैठक घेऊन यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्टीकरण संस्थेचे अध्यक्ष कोंडीजीमामा आव्हाड यांनी लोकमतशी बोलताना दिले. कोणाच्या दबावाने निवडणुकीचा निर्णय घेतला जाणार नाही, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.नाईक शिक्षण संस्थेच्या निवडणूक घेण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप सभासदांच्या एका गटाकडून केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मध्यंतरी या गटाने माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या उपस्थितीत सिडकोत बैठक घेतली होती. त्यानंतर शनिवारी (दि.२५) कार्यकारिणीची बैठक होणार असून, त्यात निवडणुकीचा निर्णय घेतला जाणार आहे.येत्या शनिवारी (दि. २५) दुपारी १ वाजता संस्थेचे अध्यक्ष कोंडीजीमामा आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत निवडणुकीबाबत चर्चा करण्याबरोबरच गेल्या दि. २८ फेब्रुवारी २०१९चे सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, आदींची चर्चा करण्यात येणार असल्याचे संचालकांकडून सांगण्यात आले़ दरम्यान, विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ संपण्यास अजून दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी असल्याने दरमहा होणाऱ्या बैठकीत निवडणुकीबाबत सखोल चर्चा करण्यात येणार नसून इतर विषयांबाबत चर्चा होणार आहे, तर दुसरीकडे विरोधी गटाकडून माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे हित जोपासून संस्थेची अधिक प्रगती होण्यासाठी येत्या निवडणुकीत तरुणांना संधी देण्याबाबत चाचपणी करीत असल्याचे विरोधी गटाचे निमंत्रक मनोज बुरकुले यांनी सांगितले.संस्थेची येत्या शनिवारी संचालक मंडळाची दरमहा होणारी बैठक आहे. आम्ही कोणताही धसका घेतला नसून निवडणुकीला अजून दोन महिन्यांहून अधिक कालावधी असल्याने यासाठी स्वतंत्र बैठक घेण्यात येऊन यात निवडणुकीबाबत निर्णय घेतला जाईल. संथा ही कोणाच्या दबावाखाली चालत नाही.- कोंडाजीमामा आव्हाड, अध्यक्ष, व्ही.एन.नाईक संस्था

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिक