शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
4
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
5
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
6
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
7
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
8
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
9
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
10
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
11
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
13
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
14
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
15
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
16
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
17
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
18
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
19
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
20
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 

...उम्रभर की यादें व्हीव्हीपॅट में कहा रहेंगी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 01:28 IST

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होताच, निवडणुकीशी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संबंध असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर निवडणूक आचारसंहितेचे तंतोतंत पालन करण्याच्या जबाबदारीबरोबरच, प्रशासकीय तयारीचा अतिरिक्त भार टाकला गेला आहे.

नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होताच, निवडणुकीशी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संबंध असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर निवडणूक आचारसंहितेचे तंतोतंत पालन करण्याच्या जबाबदारीबरोबरच, प्रशासकीय तयारीचा अतिरिक्त भार टाकला गेला आहे. साधारणत: बारा ते सोळा तास अंगमोडून अधिकारी, कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त झालेले असताना अशा परिस्थितीतही त्यांनी त्यांच्यातील कलावंत जिवंत ठेवून त्यावर विनोदी पद्धतीने भाष्य करत आपल्यातील दु:खावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या शेरोशायरीतून चिमटे काढत, व्यथाही प्रकट केली आहे. सोशल माध्यमावर या शेरोशायरीने नेटक-यांचे मात्र निखळ मनोरंजन होताना दिसून येत आहे.शासकीय अधिकारी, कर्मचाºयांनी केलेल्या शायरीतून लोकसभा निवडणुकीचे प्रत्यक्ष काम करणाºया आपल्याच सहकारी अधिकाºयांवरही ताशेरे ओढले असून, त्यातून निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारीदेखील सुटलेले नाहीत. ‘सुना हंै, तेरे सामने सब हार जाते है, ऐ इश्क, तू चुनाव क्यू नही लडता?’ असा मार्मिक प्रश्न प्रेमाला विचारण्याबरोबरच ‘दिलों में भी अब आचारसंहिता लागू कर ही दो, उन्हे याद करना... अब गुनाह होना चाहिये’ अशा शब्दात आचारसंहितेसंबंधी केल्या जात असलेल्या बाऊची खिल्ली उडविण्यात आली आहे.‘वो इशारा करते रहे और हम मोहब्बत समझते रहे; फिर क्या था... आचारसंहिता भंग हुई और गुनाह दाखिल हो गया’, असे म्हणत, ‘लफजों पे गर बंदिशे हंै और इशारा करना गुनाह हैं, तू खत ही लिख दे व्हीव्हीपॅटका, मैं पढ भी लुंगा और किसी को पता भी न चलेगा’ निवडणूक आयोगालाही त्यात ओढण्यात आले आहे. दौर कागजी था, तब तक ठिक था, देर तक खतों मे जज्बात महफूज रहते थें...मशिनी दौर है, उंगली से डिलीट कर दोगे यादें...उम्र भर की यादें व्हीव्हीपॅट में कहा रहेंगी?’अशा शब्दात व्हीव्हीपॅट वापरण्यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.निवडणुकीच्या कामासाठी सर्वच शासकीय खात्याच्या अधिकारी, कर्मचारी, महिला व पुरुषांची नेमणूक करण्यात आली असून, काहींची निवडणुकीच्या कामाची ड्युटी रद्द करण्यासाठी धडपड सुरू आहे. त्याचा धागा पकडत शायर म्हणतो, ‘काश तूम आ जाती ड्युटी कॅन्सल कराने के बहाने...बेबस होके कहता, पगली ये नही मेरे अधिकार मे’ असे म्हणून पुढे ‘काश तूम आ जाते ड्युटी कॅन्सल करने के बहाने... ड्युटी कॅन्सल देते, व्हॉट््स अप नंबर लेके’ असे म्हणत सहायक निवडणूक अधिकाºयांची फिरकी घेण्यात आली आहे. या शेरोशायरीतून निवडणुकीचे काम करणारे झोनल अधिकारीही सुटले नाहीत. शायर म्हणतो...काश बारा बुथोंमे कुछ तो एैसे हो,हर चिज के लिए उन्हे झोनल की जरूरत होइन बुथो में में ‘उनको’ कुछ परेशानियां हो,प्रथम और द्वितीय हेकडी के शिखर पर हों,और उसी समय हम बूथ सामान देने आयेशिद्दत से परेशानियां ‘उनकी’ हम दूर करेपर्ची, शाई न सही नजरों से हीदिल को ठंडा कर ले...मतदान केंद्रांवर मतदाराने हक्क बजाविल्यानंतर त्याच्या बोटाला शाई लावणाºया तृतीय मतदान अधिकाºयाला डोळ्यासमोर ठेवत शायर म्हणतो...‘काश तूम आ जाती वोट डालने केबहाने... बटन दबाने से पहले हात थाम लेते, स्याही चेक करने के बहाने’ असे म्हणून या टीका टिप्पनीतून पोलीसही सुटले नाहीत. ‘काश तुम आ जाती वोट डालने के बहाने...तुमको घूर लेता, अलग लाइन लगाने के बहाने...’ऐन निवडणुकीच्या धामधुमीतअधिकारी, कर्मचाºयांना सूचत असलेल्या या शेरोशायरीने मनोरंजन होत असून,राज्यातील निवडणूक अधिकाºयांच्या सोशल माध्यमावर ते जोरदारपणे व्हायरल केले जात आहे.मतदान केंद्रावर नेमण्यात येणाºया कर्मचाºयांपासून ते निवडणुकीचे नामांकन दाखलकरून घेणाºया वरिष्ठ अधिकाºयांनाही शायरीतून आडवे हात घेण्यात आले असून, त्यात म्हटले आहे, ‘काश तूम आ जाती नामांकनपत्र भरने के बहाने... कुछ बाते करते शपथ देने के बहाने’ असे म्हणून ‘काश तुम आ जाती नॉमिनेशन फाइल करने के बहाने, छु लेते तुम्हारे हात, नॉमिनेशन स्वीकार करने के बहाने’ अशा शब्दात अधिकाºयांची खिल्ली उडविण्यात आली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय