शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

मिळकतींवर मर्यादा आणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 00:24 IST

मिळकती बांधण्यापेक्षा त्यांच्या देखभाल दुरुस्तीवर होणारा खर्च आणि कोणत्या संस्थेला चालविण्यास दिल्यानंतर निर्माण होणाऱ्या कायदेशीर अडचणी याचा विचार करून आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अखेरीस मिळकतींच्या बांधकामांवर मर्यादा आणण्याचे ठरविले असून, त्यानुसार आता एका प्रभागात तीन समाजमंदिरे बांधण्यात येणार आहेत. तर प्रत्येक प्रभागात व्यायामशाळा आणि अभ्यासिका प्रत्येकी एकेकच असणार आहे.

नाशिक : मिळकती बांधण्यापेक्षा त्यांच्या देखभाल दुरुस्तीवर होणारा खर्च आणि कोणत्या संस्थेला चालविण्यास दिल्यानंतर निर्माण होणाऱ्या कायदेशीर अडचणी याचा विचार करून आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अखेरीस मिळकतींच्या बांधकामांवर मर्यादा आणण्याचे ठरविले असून, त्यानुसार आता एका प्रभागात तीन समाजमंदिरे बांधण्यात येणार आहेत. तर प्रत्येक प्रभागात व्यायामशाळा आणि अभ्यासिका प्रत्येकी एकेकच असणार आहे.महापालिकेच्या स्थापनेनंतर शहरात मोठ्या प्रमाणात समाजमंदिर, अभ्यासिका आणि व्यायामशाळा बांधण्यात आल्या आहेत. सुमारे नऊशेहून अधिक  मिळकती असून, त्यातील बहुतांशी मिळकती विविध सेवाभावी संस्थांना चालविण्यासाठी देण्यात आल्या आहेत.ज्या मिळकती महापालिका चालवित असून, त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी पुरेसे मनुष्यबळ नाही. काही मिळकती महापालिकेने भाड्याने दिल्यानंतर त्याचा व्यावसायिक वापर, अतिक्रमित बांधकाम असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर त्याचा त्रास प्रशासनाला आणि संबंधित संस्थांना सहन करावा लागत आहे.महापालिकेच्या मिळकतींच्याबाबतीत राज्य शासनाने कठोर भूमिका घेत नाममात्र दरावर मिळकती भाड्याने देण्यास मनाई केली असून, रेडिरेकनरच्या ३ ते ८ टक्के भाडे आकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात भाडे भरण्याची सेवाभावी संस्थांची तयारी नाही.संस्थांवर जबाबदारीआयुक्तांनी आता नवीन मिळकतींचा भार न वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी एका प्रभागात जास्तीत जास्त तीनसमाजमंदिरे, तसेच प्रत्येकी एक व्यायामशाळा, अभ्यासिका बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यालाही अंतराची मर्यादा घालण्यात आली आहे. याशिवाय ज्यांना यापूर्वी मनपाची मिळकत भाड्याने घेतली आहे. त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित संस्थांवर देण्याचे आणि जुन्या मिळकतींचे गुगल मॅपिंगचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.नगरसेवकांची अडचणबहुतांशी नगरसेवकांना आपल्या भागात नवीन मिळकत बांधायची असते. मात्र आयुक्तांनी मर्यादा घातल्याने नगरसेवकांनादेखील अडचणीचे होणार आहे. विशेषत: खुल्या जागेत समाजमंदिर किंवा तत्सम मिळकत बांधण्याची मागणी असते. अशावेळी आयुक्तांच्या नव्या आदेशाने अडचण निर्माण होणार आहे दुसरीकडे आमदार निधीतून समाजमंदिर बांधण्यासाठी आमदार आता आयुक्तांचा हा निकष मान्य करतील काय याविषयी शंका आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcommissionerआयुक्त