शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आडगाव परिसरात मनपा लावणार का ‘दिवे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 00:55 IST

बळीराज जलकुंभ ते आडगाव म्हसरूळ शिवरोडवर मोठ्या नागरी वसाहतीबरोबर वसतिगृह, पोलीस वसाहत शिवाय प्रशासकीय कार्यालयाकडे जाण्याचा जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे या मार्गावर पथदीप बसविण्याची मागणी होत होती. या मागणीचा विचार करून प्रशासनाने पाच ते सहा महिन्यांपूर्वी पथदीपांचे खांब उभे केले. मात्र या पथदीपांना दिव्यांची प्रतीक्षा असल्याने हा परिसर अंधारात आहे.

ठळक मुद्देभुरट्या चोऱ्यांमध्ये वाढ : पथदीव्यांची प्रतीक्षा; नागरिकांमध्ये नाराजी

आडगाव : बळीराज जलकुंभ ते आडगाव म्हसरूळ शिवरोडवर मोठ्या नागरी वसाहतीबरोबर वसतिगृह, पोलीस वसाहत शिवाय प्रशासकीय कार्यालयाकडे जाण्याचा जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे या मार्गावर पथदीप बसविण्याची मागणी होत होती. या मागणीचा विचार करून प्रशासनाने पाच ते सहा महिन्यांपूर्वी पथदीपांचे खांब उभे केले. मात्र या पथदीपांना दिव्यांची प्रतीक्षा असल्याने हा परिसर अंधारात आहे.बळीराज जलकुंभ ते आडगाव म्हसरूळ जोडणारा शिवरस्ता (रिंग रोड) मेडिकल कॉलेज, मेट कॉलेज, ग्रामीण पोलीस मुख्यालय कर्मचारी, महावीर कॉलेज, म्हसरूळ, आडगाव, निसर्ग कॉलेज, आरोग्य विज्ञानपीठाकडे जाण्याचा जवळचा मार्ग असून, या रस्त्याच्या वापरामुळे महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होतो. शिवाय सागर व्हिलेज, श्रीरामनगर, कर्मयोगीनगर, राम गाडीया भवन, के. के. वाघ शाळा, महाविद्यालय, के. के. वाघ कृषी महाविद्यालय, भुजबळ कॉलेज होस्टेल, पोलीस वसाहत, एचएएल कर्मचारी वसाहत या मार्गावर आहे. त्यामुळे कायम या रस्त्यावर वर्दळ असते. शिवाय सकाळी कामावर जाणाºया स्थानिक नागरिकांची गर्दी असते. या मार्गावर अनेकवेळा सोनसाखळी चोºया, भुरट्या चोºया आणि गोळीबार यांसारख्या गंभीर घटना घडलेल्या आहेत. या रस्त्याच्या अर्ध्या मार्गावर पथदीप बसविलेले आहे, परंतु अर्धा मार्ग अंधारात असल्यामुळे रात्रीचे जाणे-येणे बरेच लोक टाळतात. त्यामुळे उर्वरित मार्गावर पथदीप बसविण्याची मागणी नागरिकांनी केली होती. याची दखल घेत पोलदेखील उभारण्यात आले. परंतु चार ते पाच महिने उलटूनही त्यावर दिवे बसविले गेले नसल्याने हा परिसर अंधारात आहे.बळीराज जलकुंभ ते आडगाव म्हसरूळ या रस्त्यावर नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे या मार्गावर पथदीप बसविण्याची मागणी होत होती. या मागणीचा विचार करून प्रशासनाने पाच ते सहा महिन्यांपूर्वी पथदीपांचे खांब उभे केले. मात्र पथदीपांना दिव्यांची प्रतीक्षा असल्याने हा परिसर अंधारात आहे. त्यामुळे या ठिकाणी तातडीने पथदीप बसवावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाelectricityवीज