शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

ग्रीन फिल्ड प्रकल्पाचे स्थलांतर होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 01:18 IST

स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद शिवारात प्रस्तावित करण्यात आलेला हरित विकास म्हणजेच ग्रीन फिल्ड प्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद शिवारात प्रस्तावित करण्यात आलेला हरित विकास म्हणजेच ग्रीन फिल्ड प्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. स्थानिक शेतकऱ्यांची बागायती शेती जाण्यापेक्षा अन्यत्र जागा असेल तर सुचवा असे खुद्द पालकमंत्री गिरीश महाजन यांनीच शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला सूचित केले असून, त्यांनी काही जागाही सूचवल्या आहेत. तसेच मुंबईत यासंदर्भात स्मार्ट सिटीच्या अधिका-यांसमवेत बैठक बोलाविण्याचे आश्वासनदेखील महाजन यांनी बुधवारी (दि.२४) दिले.मुंबई येथे यासंदर्भात भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांच्या प्रतिनिधींनी पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. यावेळी हे निर्देश त्यांनी दिले. स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून मौजे नाशिक व मखमलाबाद शिवारात ग्रीन फिल्ड डेव्हलपमेंट अर्थात हरित क्षेत्र विकास योजना राबविण्यात येणार आहे. याठिकाणी जागतिक दर्जाच्या सुविधा असतील आणि भूखंड विक्रीला उपलब्ध असतील. त्यासाठी शेतकºयांच्या जमिनी ताब्यात घेऊन नगरविकास योजना राबविण्यात येणार आहे. सर्व शेतकºयांच्या जमिनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पन्नास टक्के जागा असलेले फायनल प्लॉट देण्यात येणार आहेत. वाढीव एफएसआय आणि अन्य पायाभूत सुविधादेखील जागा मालकांना देण्यात येणार आहे. सुरुवातीला सर्वच शेतकºयांचा या प्रकल्पाला विरोध होता. त्यामुळे कंपनीलाबागायती जमिनीचा व्हिडीओ दाखवलामखमलाबाद शिवारात बागायती जमिनी मोठ्या प्रमाणात असून, नागरी वसाहती आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातील व्हिडीओ चित्रीकरण करून तेच बुधवारी (दि.२४) पालकमंत्री गिरीश महाजन यांना दाखवण्यात आले. त्यामुळे त्यांनीदेखील सबुरीचे धोरण घेतल्याचे वृत्त आहे. विशेषत: विधानसभा निवडणुका तोंडावर असून त्यामुळेच त्याबाबत आता सबुरीचे धोरण घेतले गेल्याचे सांगितले जात आहे.शेतकºयांत यासंदर्भात दोन गट असून प्रबळ विरोध करणाºया गटाने बुधवारी (दि.२४) मुंबईत पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली आणि सदरचा भाग हा शेतीसाठी उपयुक्त असून त्यात अनेकांनी ऊस लावला आहे. बागायती क्षेत्र उद्ध्वस्त करून त्यावर इमले कसे काय बांधता येतील याबाबत शेतकºयांनी कैफियत मांडली. स्मार्ट सिटीअंतर्गत योजना राबविण्यास विरोध नाही, मात्र जागा चुकल्याचे म्हणणे शेतकºयांनी मांडले...या पर्यायी जागांची झाली सूचनाम्हसरूळ-आडगाव रोडवरील जागाआरोग्य विद्यापीठाच्या समोर डोेंगर परिसरात असलेलीमोकळी जागाअंबड जवळील पांझरापोळच्या ताब्यात असलेले क्षेत्र

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी