शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्रिपदामुळे भाजपला मिळेल का बूस्टर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 00:27 IST

आदिवासी समाजातील उच्चविद्याविभूषित महिलेला मानाची संधी दिली. आरोग्य व कुटुंब कल्याण या त्यांच्या शिक्षण व व्यवसायाशी निगडित खाते दिले.

ठळक मुद्देमहापालिकेच्या बससेवेचे लोकार्पण करून भाजपने आश्वासनपूर्तीच्या दिशेने एक पाऊल भाजपनेदेखील आदिवासी समाजातील उच्चविद्याविभूषित महिलेला मानाची संधी दिली.भाजपला फायदा काय ?

मिलिंद कुलकर्णीनाशिक जिल्ह्याच्या दृष्टीने गेला आठवडा हा दोन महत्त्वपूर्ण गोष्टींनी आनंदमयी ठरला. दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांचा आकस्मिकपणे केंद्रीय मंत्रिमंडळात झालेला समावेश आणि महापालिकेच्या बहुप्रतीक्षित बससेवेचा प्रारंभ या दोन घटना आहेत.

योगायोगाने दोन्ही घटना या भाजपशी संबंधित असून, त्याचा परिणाम भाजपच्या भविष्यातील वाटचालीवर, कामगिरीवर होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नेते स्व. ए.टी. पवार यांचा व त्यांच्या कुटुंबियांचा जिल्ह्याच्या राजकारणावर दबदबा राहिला आहे. मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सदस्य अशी पदे या कुटुंबात नियमित स्वरूपात येत राहिली; परंतु थेट केंद्रात मंत्रिपद हे पहिल्यांदा घडले. भाजपनेदेखील आदिवासी समाजातील उच्चविद्याविभूषित महिलेला मानाची संधी दिली. आरोग्य व कुटुंब कल्याण या त्यांच्या शिक्षण व व्यवसायाशी निगडित खाते दिले. हा एकप्रकारे पवार आणि नाशिक जिल्ह्याचा सन्मान आहे. त्यांच्या खात्याचा उपयोग आता नाशिक जिल्ह्याला होण्यासाठी डॉ. पवार यांना प्रयत्न करावे लागतील. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बससेवा लोकार्पण कार्यक्रमात फडणवीस यांच्यासमोर तशी अपेक्षा व्यक्त केली आहेच.

भुजबळ राजकारण म्हणून हे बोलले असले तरी, सर्वसामान्य नाशिककरांची अशीच भावना आहे. कोरोनाकाळात नाशिककरांनी खूप भोगले. रोज ५ हजार नवे रुग्ण येत असल्याने नाशिकचे नाव देशपातळीवर चर्चेत होते. नाशिकसारखे महानगर आणि आदिवासी व ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा मजबूत करण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य सरकार अशा दोन्ही सरकारांकडून ठोस प्रयत्नांची अपेक्षा आहे. तिसऱ्या लाटेविषयी पंतप्रधानांनी इशारा दिलेला असताना ऑक्सिजन प्रकल्पांची स्थिती बिकट आहे. जूनअखेर ४० प्रकल्प तयार होतील, अशी ग्वाही मंत्र्यांनी व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिलेली असताना केवळ भुजबळ व भुसे या मंत्र्यांच्या मतदारसंघात प्रकल्प कार्यान्वित झाले. उर्वरित ठिकाणी ते रखडले आहेत. अशा स्थितीत आम्ही तिसऱ्या लाटेचा कसा सामना करणार आहोत, पहिल्या लाटेचा अनुभव असूनही दुसऱ्या लाटेत नियोजन कोलमडल्याचे आपण सगळ्यांनी बघितले. त्याची पुनरावृत्ती होऊ नये.भाजपला फायदा काय ?डॉ. भारती पवार यांच्या रूपाने पहिल्या नाशिककराला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याचा आनंद आहे. पूर्वी पोटनिवडणुकीत यशवंतराव चव्हाण हे नाशिकहून बिनविरोध निवडून आले आणि केंद्रात मंत्री झाले. मालेगावच्या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे हे मोदींच्या पहिल्या कार्यकाळातील मंत्रिमंडळात समाविष्ट झाले होते. तांत्रिकदृष्ट्या हे दोन्ही नाशिकशी संबंधित असले तरी मूळ नाशिककर नाहीत.

उत्तर महाराष्ट्रात ६ पैकी भाजपचे ५ खासदार निवडून आले असताना डॉ. पवार यांची निवड ही गौरवाची गोष्ट आहे. डॉ. सुभाष भामरे यापूर्वी मंत्री होते. रक्षा खडसे या दुसऱ्यांदा खासदार झाल्या, तरी सासरे एकनाथ खडसे यांचे पक्षश्रेष्ठींशी असलेले वितुष्ट पाहता त्यांची शक्यता नव्हती. डॉ. हीना गावित प्रबळ दावेदार होत्या. त्याही दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. राजकीय पार्श्वभूमी आहे. अभ्यासू म्हणून स्वत: मोदींनी त्यांचे कौतुक केले आहे; पण त्यांना संधी का मिळाली नाही, हे कोडे आहे.

डॉ. पवार यांच्या मंत्रिपदाने नाशिक जिल्ह्यातील राजकीय समीकरण व भाजपवर काय परिणाम होतो, याविषयी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे दोन प्रबळ प्रतिस्पर्धी भाजपसमोर आहेत. जिल्हा परिषद हस्तगत करणे व महापालिकेची सत्ता कायम राखणे ही दोन प्रमुख आव्हाने भाजपसमोर आहेत. डॉ. पवार यांच्या रूपाने केंद्र सरकारचा निधी नाशिक शहर व जिल्ह्यात आणला तर भाजपच्या दृष्टीने ते लाभदायी ठरेल. मात्र, एकमुखी नेतृत्वाचा प्रश्न भाजपला सोडवावा लागेल. गिरीश महाजन, जयकुमार रावल या बाहेरील नेतृत्वाच्या बळावर भाजप किती दिवस वाटचाल करेल,

स्थानिक नेतृत्वाला पक्षश्रेष्ठी कधी बळ देतील, हे संघटनात्मक प्रश्नदेखील भाजपला सोडवावे लागतील. महापालिकेच्या बससेवेचे लोकार्पण करून भाजपने आश्वासनपूर्तीच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. स्मार्ट सिटी योजनेतील हा महत्त्वाचा टप्पा आहे. ही सेवा सक्षमपणे चालणे महत्त्वाचे आहे. भुजबळ यांनी तोट्याचा उल्लेख करून नेमक्या गोष्टीवर बोट ठेवले. आता या योजनेतील कामे वेळेत आणि चांगली होण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यावरच भाजपचे यशापयश अवलंबून राहणार आहे. 

टॅग्स :Dr Bharti Pawarडॉ. भारती पवारPoliceपोलिस